Jitendra Awhad : रोहित पवारांचा आव्हाडांना डोस; म्हणाले, “नको त्या…”
Jitendra Awhad Rohit Pawar : जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल केलेल्या विधानावर बोलताना आमदार रोहित पवारांनी यांनी नाराजी व्यक्त केली. बोलताना भान राखायला हवं असे म्हणत लोकांच्या प्रश्नावर बोलण्याचा सल्ला आव्हाडांना दिला.
ADVERTISEMENT
Rohit Pawar Jitendra Awhad : “राम आपला आहे, बहुजनांचा आहे. राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता”, असे विधान केले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी! आव्हाडांच्या याच विधानावरून शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधकांच्या टीकेची धनी ठरत आहे. आव्हाडांना लक्ष्य केलं जात आहे. पण, त्यात स्वतः पक्षातील रोहित पवारांनीच आव्हाडांना बोलताना भान ठेवा, असा डोस दिला आहे. (Rohit Pawar Reaction on Jitendra Awhad Controversial Statement)
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने विरोधकांना आयता मुद्दा दिल्याचे दिसत आहे. भाजपसह सत्ताधारी बाकावरील पक्षांकडून जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं जात आहे. जितेंद्र आव्हाडांनी मात्र, आपण भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत सोबत असणाऱ्या अजित पवारांच्या गोटातील नेतेही आव्हाडांना घेरताना दिसत आहेत.
रोहित पवार जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर काय बोलले?
हेही इथंच थाबंलं नाहीये. विरोधकांना आयते कोलीते दिल्याने आव्हाडांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही खरमरीत सल्ला दिला आहे. रोहित पवार आव्हाडांच्या विधानावर काय बोलले आणि त्यांनी काय सल्ला दिलाय, ते वाचा…
हे वाचलं का?
हेही वाचा >> ठाकरेंना 18, पवारांना 6 जागा; काँग्रेसने ठरवला ‘मविआ’चा फॉर्म्युला
रोहित पवार म्हणतात, “आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.”
हेही वाचा >> दक्षिणेचा किल्ला भेदण्यासाठी मोदी मैदानात, भाजपचं ‘मिशन साऊथ’ काय?
रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपला लक्ष्य करताना आव्हाडांना बोलताना भान ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून… याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे”, असं रोहित पवारांनी आव्हाडांच्या विधानावर म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान काय?
शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणालेल की, “राम आपला आहे. बहुजनांचा आहे राम! शिकार करून खाणारा राम. तो आमचा बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला शाकाहारी बनवायला जाता आहात, तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत. आम्ही आज मटण खातो. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. १४ वर्ष जंगलात राहणारा माणूस, कुठे जाणार शाकाहारी शोधायला. बरोबर की नाही”, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT