Mohan Bhagwat on Bharat : अखंड भारत कधी होणार? सरसंघचालकांनी सांगितली डेडलाईन
Mohan Bhagwat akhand bharat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांनी अखंड भारताबद्दल मोठे विधान केले आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि तिबेट हे ‘अखंड भारत’चे भाग आहेत.
ADVERTISEMENT
Mohan Bhagwat statement on Akhand Bharat : अखंड भारताबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. भारतापासून वेगळे झालेल्या देशांना आता त्यांची चूक लक्षात येत आहे, असं सांगत मोहन भागवत यांनी या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. (Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat’s new statement on Akhand Bharat)
ADVERTISEMENT
मोहन भागवत यांनी बुधवारी (7 सप्टेंबर) नागपुरातील श्री अग्रसेन वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. एका विद्यार्थ्याने त्यांना विचारले की, ‘आम्हाला अखंड भारत कधीपर्यंत बघायला मिळेल?’
त्यावर उत्तर देताना भागवत म्हणाले, “अखंड भारत बनायला किती दिवस लागतील, हे मी सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ग्रहज्योतिष पाहावे लागेल. मी प्राण्यांचा डॉक्टर आहे. पण अखंड भारत करायला गेलो तर म्हातारे होण्याआधीच दिसेल.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> Air hostess murder : चिरलेला गळा,रक्ताने माखलेली फरशी; रुपल ओगरेच्या हत्येची CCTV त कैद झाली स्टोरी
भागवत पुढे म्हणाले, “कारण परिस्थिती आता बदलत आहे. भारतापासून वेगळ्या झालेल्यांना त्यांनी चूक केली असे वाटू लागले आहे. आपण पुन्हा भारत व्हावे. पण भारत असणं म्हणजे नकाशावरील रेषा पुसून टाकणं असा त्यांचा समज आहे. पण ते तसे नाही. फक्त त्यामुळे अखंड भारत होणार नाही.”
हेही वाचा >> India Rename as Bharat : मोदी सरकारला इंडिया नाव बदलण्यासाठी काय करावं लागेल?
सरसंघचालक म्हणाले की, “भारत असणे म्हणजे भारताचे स्वभाव स्वीकारणे. भारताचा स्वभाव मान्य नव्हता, म्हणूनच भारताची फाळणी झाली. तो स्वभाव ज्यावेळी येईल, तेव्हा संपूर्ण भारत एक होईल. हे सर्व शेजारील देशांना शिकवण्याचे काम आपण आपल्या आयुष्यात केले पाहिजे. करत आहोत. आम्ही मालदीवला पाणी पाठवत आहोत, श्रीलंकेला पैसे पाठवत आहोत. नेपाळच्या भूकंपात मदत केली. बांगलादेशला मदत करतो. सगळ्यांना मदत करतो.”
मोहन भागवतांनी सांगितली जुनी गोष्ट
भागवतांनी यावेळी एक जुनी गोष्ट सांगितली. ते म्हणाले, “1992-93 मध्ये सार्कचे अध्यक्ष असताना प्रेमदासा (श्रीलंकेचे माजी अध्यक्ष) म्हणाले होते की, जगातील मोठे देश लहान देशांना गिळंकृत करतात. म्हणूनच आपण सावध राहिले पाहिजे आणि एकजूट राहिले पाहिजे. दक्षिण आशियातील देशांसाठी हे अवघड काम नाही. आपण आता जगात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात आहोत. पण प्रत्यक्षात आपण त्याच भारताचा भाग आहोत.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?
“भारत माझी माता आहे, ही भावना निर्माण झाली पाहिजे”, असे भागवत म्हणाले. “आपले पूर्वज समान आहेत. आपली संस्कृती ज्या आधारावर उभी राहिली आहे, ती मूल्येही समान आहेत.”
ADVERTISEMENT
आरएसएसचा अखंड भारत कसा?
आरएसएस कायम अखंड भारत हा मुद्दा मांडत आला आहे. आरएसएसने अखंड भारताचा नकाशाही दाखवतो. RSS च्या दृष्टीने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि तिबेट हे ‘अखंड भारत’चे भाग आहेत. राष्ट्राय स्वयंसेवक संघ या सर्वांना एक राष्ट्र मानतो, यामागे हिंदू सांस्कृतिक समानतेचा आधार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT