Aryan Khan: समीर वानखेडेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा, पाहा कोर्टात काय घडलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

sameer wankhede cannot be arrested till june 8 high court ordered see what happened in the court
sameer wankhede cannot be arrested till june 8 high court ordered see what happened in the court
social share
google news

मुंबई: आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणावरुन अडचणीत आलेले NCB चे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ज्याप्रकरणी आज (22 मे) हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने समीर वानखेडेंना मोठा दिलासा देत 8 जूनपर्यंत अटकेची कारवाई न करण्याचे आदेश CBI ला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 8 जूनला होणार आहे. (sameer wankhede cannot be arrested till june 8 high court ordered see what happened in the court)

ADVERTISEMENT

समीर वानखेडे यांच्यावर CBI ने आर्यन खान अटक प्रकरणी चार्जशीट फाईल केली आहे. याच आरोपांविरोधात वानखेडे यांनी कोर्टात रीट याचिका दाखल करत सीबीआयचे आरोप खोटे असल्याने एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI)दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक खुलासे झाले आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याची योजना आखण्यात आली होती, असे एफआयआरमधून समोर आले आहे. या प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी हा आर्यनकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा कट आखत होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Mumbai: उद्धव ठाकरेंच्या नव्या ‘मातोश्री’च्या बांधकामादरम्यान अपघात, एका मजुराचा मृत्यू

तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या वतीने केपी गोसावी हा शाहरुख खानकडून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. एफआयआरनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत आर्यन खानसह आरोपींना स्वतंत्र पंच केपी गोसावी यांच्याकडून खासगी वाहनातून एनसीबी कार्यालयात आणण्यात आल्याचे समोर आले आहे.

समीर वानखेडेवर सीबीआयसी कारवाई करणार?

NCB ने आपला चौकशी अहवाल हा CBI कडे सोपवला आहे. विभागाने CCS नियमांनुसार त्यांची चौकशी केली आहे. यानंतर सीबीआयसी वानखेडे यांच्यावर विभागीय कारवाई सुरू करू शकते. सीबीआयसीच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, एनसीबीच्या अहवालाव्यतिरिक्त, वानखेडेंबाबत इतरही काही शिस्तभंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

NCB च्या अहवालात वानखेडे यांच्या संबंधात भ्रष्टाचार, गैरव्यवहार, खंडणी, CCS नियमांचे उल्लंघन आणि बेहिशोबी मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि खंडणीची कलमे नमूद आहेत. विभागाची शिस्तभंगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीबीआयसी वानखेडे यांना निलंबित करू शकते किंवा अन्य काही कारवाई करू शकते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> 2000 notes : 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटांचं काय होणार? दास म्हणाले…

मात्र, तूर्तास त्यांना ही कारवाई करता येणार नाही. कारण आता हे प्रकरण हायकोर्टासमोर गेलं असून त्याबाबत कोर्ट आपला नेमका निकाल देईल. त्यानंतरच या प्रकरणी कोणती कारवाई करायची याचा निर्णय आता सीबीआय घेईल.

पाहा कोर्टात नेमकं काय घडलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT