Sangli News : नगरसेवकाकडून गोळीबार, सांगलीत रात्री काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sangli crime news corporator fire on some people
sangli crime news corporator fire on some people
social share
google news

Sangli Crime news : राज्यात वाढत्या गुन्ह्याच्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच सांगलीत नगरसेवकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसर शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून, त्यानंतर काही काळ भीतीचं वातावरण होतं. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून या परिसरात नगरसेवकाने फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. (Sangli municipal corporation corporator firing on group of youth)

ADVERTISEMENT

सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलला लागून एक झोपडपट्टी परिसर आहे. या परिसरात नशा करणाऱ्यांचा वावर असतो. शिवाय शंभर फुटी रस्त्यावरही काही नशेबाज या परिसरात फिरत असतात. शनिवारी (3 जून) रात्री त्या नशेबाज मुलासोबतच्या एकाशी संबंधित नगरसेवकाच्या एका कार्यकर्त्याचा वाद झाला.

हेही वाचा >> Maharashtra Politics : भाकरी फिरवली! भगीरथ भालके सोडणार शरद पवारांची साथ?

सांगलीत शनिवारी रात्री काय घडलं?

नशा करणारे तरुणी त्या कार्यकर्त्याचा शोध घेत काही जणांना घेऊन सिव्हिल हॉस्पिटल जवळ असलेल्या नगरसेवकाच्या हॉटेलसमोर पोहोचले. तिथे वाद सुरू झाला. त्यावेळी तिथे संबंधित नगरसेवक मयूर पाटील गेले. त्यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

तरुण अंगावर चाल करून आल्याने नगरसेवकाने फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेची माहिती घेत आहेत.

हेही वाचा >> Sakshi Murder Case : “डोक्याचे झाले होते चार तुकडे, पोटातील आतडेही…”

हा प्रकार नेमका कशातून घडला तसेच नेमके कुणी फायरिंग केले, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत कोणताही नोंद केला गेला नव्हता. दरम्यान, रविवारी याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हॉटेलसमोर घातला दंगा

मिळालेल्या माहितीनुसार, नशा केलेल्या तरुणांनी वादात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून नगरसेवक मयूर पाटील यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या नशा केलेल्या तरुणांच्या गटाने दगडफेकही केली. त्यांच्या हॉटेल समोरही दंगाही केला. यामध्ये नगरसेवक मयूर पाटील यांच्या चारचाकी गाडीच्या मागच्या काचेवर दगड लागून ती फुटली. तसेच गाडीचे नुकसान झाले आहे. मयुर पाटील यांनी दगडफेकीपासून स्वतःच्या बचावासाठी फायरिंग केल्याचे समजते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT