Chhatrapati Sambhaji Nagar : भयंकर अग्नितांडव! एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर येथे आगीच्या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगरमधील भयंकर घटना

point

दुकानाला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू

point

मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश

fire broke out in  Chhatrapati Sambhajinagar : (इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर) छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. यात दुकान असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. यात तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Seven Died in  A massive fire broke out in a clothing shop in the cantonment area of Chhatrapati Sambhajinagar)

ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात दाना बाजार गल्लीतील आहे. याच गल्लीतील महावीर जैन मंदिराच्या बाजूला असलेल्या कपड्याच्या दुकानात पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागली.

हेही वाचा >> '...तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन', रामदास आठवलेंचं मोठं विधान 

दुमजली इमारत असून, खाली दुकान असून, पहिल्या मजल्यावर लोक राहत होते. दरम्यान, बुधवारी (3 मार्च) पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक कपड्याच्या दुकानास आग लागली. 

हे वाचलं का?

कपड्यांमुळे काही वेळातच आग वाढत गेली आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरील लोक गाढ झोपेत होते, त्यामुळे त्यांना बाहेर पडायची संधीच मिळाली नाही. त्यात धुराचे लोट घरात गेल्याने सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

हेही वाचा >> तिसऱ्या यादीसोबत प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, थेट बारामतीतच पवारांना... 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यांना घाटी अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपचा खासदार ठाकरेंनी फोडला; 'या' मतदारसंघातील समीकरणे बदलली?

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी या इमारतीत १६ लोक होते. पहिल्या मजल्यावर ७ सात लोक होते. दुसऱ्या मजल्यावर सात लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर २ लोक होते. यात पहिल्या मजल्यावरील सात लोकांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT