Uddhav Thackeray ठाण्यात; थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली शिवसेनेच्या वाघिणीची भेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray, Rashmi Thackeray and Aditya Thackeray visited Yuva Sena activist Roshni Deepak Shinde at the hospital
Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray, Rashmi Thackeray and Aditya Thackeray visited Yuva Sena activist Roshni Deepak Shinde at the hospital
social share
google news

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्या रोशनी दीपक शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रोशनी शिंदे यांना काल (सोमवारी) शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून ठाकरे कुटुंबियांनी आज रोशनी शिंदे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तालय गाठलं. (Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray, Rashmi Thackeray and Aditya Thackeray visited Yuva Sena activist Roshni Deepak Shinde at the hospital)

ADVERTISEMENT

कोण आहेत रोशनी शिंदे?

मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी शिंदे या टिटवाळा येथे राहतात. मागील अनेक दिवसांपासून त्या शिवसेनेशी संबंधित असून सध्या त्या शिवसेना (UBT) पक्षात आहेत. सोबतच युवती सेनेसाठी काम करतात. रोशनी शिंदे या कासारवडवलीच्या टाटा मोटर्स येथे काम करतात. त्या गर्भवती असल्याचा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : Thane : ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाकडून मारहाण; वादाचं कारण आलं समोर

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रोशनी शिंदे यांनी म्हटलं की, “मी टाटा मोटर्स कासारवडवली येथे माझ्या ऑफिसमध्ये कामावर रुजू असताना कामावरून सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी आठ वाजून 25 मिनिटांनी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर 15 महिलांनी एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली.”

हे वाचलं का?

हेही वाचा : CM Eknath Shinde : शरद पवार, अरविंद सावंत अन् रिक्षावाला; नेमकं प्रकरण काय?

रोशनी शिंदे यांनी पुढे म्हटलं आहे की, “मी आपणास सांगू इच्छिते की, भी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युवती सेना म्हणून काम करीत आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले; परंतु दत्ताराम गवस यांनी माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली. त्यावेळी मी त्यांना प्रत्युत्तर दिले, ते ते मी अर्जासोबत जोडलेले आहे.”

कॉलवरुन धमक्या, नंतर ऑफिसमध्ये येऊन हल्ला; तक्रारीत काय?

“मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री साहेबांच्या बायकोचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले. यासंदर्भात माझी चूक नसताना आणि मला भांडण वाढवायचे नव्हते म्हणून मी सॉरीची पोस्ट केली, असे असताना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये वीस महिलांनी एकत्र घुसून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला”, असं रोशनी शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा – धाराशीवमध्ये मविआ अन् भाजपचा करेक्ट कार्यक्रम; CM शिंदेंनी ठाण्यात बसून दिला धक्का

“त्याबद्दल मी आपणाकडे न्याय मागत आहे, तरी आपणास विनंती आहे; मी आपल्याला या झालेल्या हल्ल्याचे ऑफिसमधील सीसी फुटेज तक्रार अर्जासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कासारवडवली यांच्याकडे 3 एप्रिल 2023 रोजी सादर केले आहे. सखोल चौकशी करून तात्काळ हल्लेखोरांवर एफआयआर दाखल करून घ्यावा, ही नम्र विनंती”, असं रोशनी शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही, खासदार राजन विचारेंसह कार्यकर्त्यांचा ठिय्या :

या प्रकरणी संबंधित महिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (UBT) पक्षाकडून कासारवडवली पोलिसांकडे करण्यात आली. पण पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा दावा करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यावेळी खासदार राजन विचारे, केदार दिघे हेही पोलीस ठाण्यात आले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT