Kalyan: हृदयद्रावक… लोकलमधून उतरताना 6 महिन्याचं बाळ हातातून निसटलं, नाल्यात गेलं वाहून

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

A shocking incident has taken place when a 4-month-old baby slipped out of a person's hand while walking on the track between Thakurli-Kalyan station and was directly swept away by a flowing water drain.
A shocking incident has taken place when a 4-month-old baby slipped out of a person's hand while walking on the track between Thakurli-Kalyan station and was directly swept away by a flowing water drain.
social share
google news

कल्याण: कल्याणसह (Kalyan) संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सध्या तुफान पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम हा मुंबईच्या लोकल ट्रेनवर झाला आहे. दुपारी 1 वाजेपासून डोंबिवलीपासून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती. ज्यानंतर अनेक लोकल ट्रेन या 2 ते 3 तासांहून अधिक वेळ एकाच ठिकाणी खोळंबून राहिल्या होत्या. अशीच एक लोकल ट्रेन ही ठाकुर्ली स्थानकाच्या पुढे बरेच तास उभी होती. त्यामुळे अनेक प्रवास लोकलमधून उतरुन चालत जात होते. याचवेळी एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. (shocking incident has taken place when a 4 month old baby slipped out of a persons hand while walking on the track between thakurli kalyan station directly swept away flowing water drain)

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ लोकल ट्रेन ही ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान सुमारे 2 तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यातच एक 6 महिन्यांचं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई देखील ट्रेनच्या बाजूने चालत होते. पण अचानक त्या काकाच्या हातातून चार महिनाचं बाळ सटकला आणि थेट त्या वाहत्या पाण्यात पडलं. ज्यानंतर बाळाच्या आईने एकच टाहो फोडला.

नेमकी घटना काय?

अतिशय काळीज पिळवटून टाकणारी अशी ही घटना आहे. कारण की, अंबरनाथ लोकल ट्रेन बराच वेळ खोळंबल्याने अनेक प्रवाशी हे ट्रॅकमधून चालू लागले. याच ट्रॅकमध्ये एक जागा अशी होती की, ज्या ठिकाणी खाली नाला होता. हे सगळे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या एका निमुळत्या जागेतून चालत होते. ज्या नाल्याच्या येथून बाई आणि काका ज्यांच्या हातात बाळ होतं ते देखील चालू लागले.. पण त्याचवेळी काकांच्या अचानक तोल गेला आणि त्यांच्या हातात असणारं बाळ हे थेट प्रचंड वाहणाऱ्या नाल्यात पडलं. यावेळी पाण्याचा वेग एवढा जोरदार होता की, ते बाळ अवघ्या काही क्षणात दिसेनासं झालं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Rain Update: मुंबई, ठाण्यात तुफान पाऊस, लोकल ट्रेन ठप्प.. पाहा LIVE Update

हा नाला कल्याण-ठाकुर्ली दरम्यान आहे. जो थेट जवळच असलेल्या कल्याण खाडीला जाऊन मिळतो. एकीकडे प्रचंड पावसामुळे आधीच खाडी तुडुंब भरली आहे. तर दुसरीकडे नाला देखील प्रचंड भरला आहे. याच पाण्याच्या प्रवाहात हे बाळ वाहून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. बाळाच्या आईदेखत हा सगळा प्रकार घडल्याने तिला प्रचंड धक्का बसला आहे.

दरम्यान, ही घटना समजताच काही लोकांना बाळाचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला. नाल्याच्या आसपास असणारे काही लोक हे नाल्यातही उतरले.. पण पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे बाळ अद्याप तरी हाती लागलं नाही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> पावसाने वाट लावली… रेल्वे ठप्प, नद्यांना पूर; पाहा हे Video

ही घटना एका प्रवाशाने ट्रेनमधूनच आपल्या मोबाइलमध्ये शूट केली. ज्यानंतर हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या सदंर्भात मध्य रेल्वे, आरपीएफकडे याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. पण जवळच असणारं एनडीआरएफचं एक पथक या बाळाचा शोध घेत असल्याचं समजतं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT