Sharad Pawar : “प्रिय बाबा…”, पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
Supriya Sule Sharad Pawar : शरद पवार यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांची पोस्ट. वडिलांना शुभेच्छा देताना सुप्रिया सुळेंनी आठवणींना दिला उजाळा.
ADVERTISEMENT

Supriya sule post on Sharad pawar's birthday
–वसंत मोरे, बारामती
Supriya Sule post on Sharad Pawar birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केलं जात आहे. पवारांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. ‘प्रिय बाबा, लढेंगे-जितेंगे’, म्हणत सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांनी लिहिलेली पोस्ट
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.