ENBA मध्ये Tak चॅनल्सचा बोलबाला, सर्वोत्कृष्ट डिजिटल मीडिया न्यूज चॅनेलसह पटकावले अनेक पुरस्कार
ENBA Awards: मुंबई Tak च्या mumbaitak.in या आपल्या वेबसाइटला यंदाचा ‘बेस्ट मायक्रोसाईट रिजनल चॅनल’ चा ENBA सुवर्ण पुरस्कार देण्यात आला.
ADVERTISEMENT
ENBA Awards 2023: नवी दिल्ली: इंडिया टुडे ग्रुपच्या Tak चॅनलने ENBA अवॉर्ड्स 2023 मध्ये त्यांच्या स्पर्धकांना खूप मागे टाकलं आहे. ज्यामध्ये मुंबई Tak च्या वेबसाइटला ‘बेस्ट मायक्रोसाईट रिजनल चॅनल’ चा ENBA सुवर्ण पुरस्कार मिळाला. तर यूपी Tak चॅनेलला हिंदीतील सर्वोत्कृष्ट डिजिटल मीडिया न्यूज चॅनेलचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय Tak चॅनल्सना एकूण 9 पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई Tak व्यतिरिक्त यूपी Tak बिझ Tak, स्पोर्ट्स Tak, साहित्य Tak आणि क्राइम Tak यांनी देखील पुरस्कार पटकावले. म्हणजेच Tak च्या एकूण 6 चॅनल्सने अवॉर्ड शोमध्ये आपला ठसा उमटवला आहे.(tak channels dominate enba winning multiple awards including best digital media news channel)
ADVERTISEMENT
कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?
ENBA च्या या 16 व्या पुरस्कार सोहळ्यात Tak च्या कोणत्या चॅनलला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहा..
- UP TAK ला सर्वोत्कृष्ट डिजिटल मीडिया न्यूज चॅनल आणि वेबसाइट uptak.in ला सर्वोत्कृष्ट मायक्रो साइट रिजनल चॅनेल (Northern Region) म्हणून सन्मानित करण्यात आले.
हे वाचलं का?
- मुंबई Tak च्या वेबसाइटला ‘बेस्ट मायक्रोसाईट रिजनल चॅनल’(Western Region) चा ENBA सुवर्ण पुरस्कार मिळाला.
- BIZ TAK ने मार्केट राऊंड अप शोसाठी सर्वोत्कृष्ट बिजनेस प्रोग्रामिंग पुरस्कार जिंकला
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> मुंबई Tak च्या शिरपेचात मानाचा तुरा, mumbaitak.in ला मानाचा ENBA पुरस्कार!
- साहित्य Tak ला बुक कॅफे शोसाठी सर्वोत्कृष्ट आयडेंटिटी शो पुरस्कार
ADVERTISEMENT
- SPORTS TAK च्या विक्रांत गुप्ता यांना 'आज का अजेंडा' शोसाठी सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट टॉक शोचा पुरस्कार मिळाला.
- CRIME TAK च्या शम्स ताहिर खान यांना सर्वोत्कृष्ट अँकरचा सिल्व्हर अवॉर्ड आणि 'शम्स की झुबानी शो'ला बेस्ट इंडेप्थ सिरीजसाठी कांस्य पुरस्कार मिळाला.
यावेळी इंडिया टुडे ग्रुपने ENBA मध्ये एकूण 108 पुरस्कार जिंकले. ENBA पुरस्कार सोहळ्यात, आज तक हा सर्वाधिक पुरस्कार मिळविणारा मीडिया ब्रँड बनला, तर इंग्लिशमध्ये इंडिया टुडे हा सर्वाधिक पुरस्कार इंग्रजी न्यूज ब्रँड बनला. तर इंडिया टुडे ग्रुप डिजिटलला सर्वात प्रतिष्ठित डिजिटल समूह म्हणून घोषित करण्यात आले. या डिजिटल ग्रुपमध्ये 'TAK' क्लस्टर्सही येतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT