"दोघांचा उद्देश एकच..." , कर्णधार होताच शुबमन गिलने रोहित-कोहलीवर दिली मोठी प्रतिक्रिया!
Shubman Gill Latest News : टीम इंडियाचा नवा टेस्ट कॅप्टन शुबमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नेतृत्व एकसारखच नव्हतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली?

"दोघांच्या नेतृत्वाची शैली वेगळी होती, पण.."

शुबमन गिल नेमकं काय म्हणाला?
Shubman Gill Latest News : टीम इंडियाचा नवा टेस्ट कॅप्टन शुबमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नेतृत्व एकसारखच नव्हतं. दोघांच्या नेतृत्वाची शैली वेगळी होती. पण या दोन्ही दिग्गजांसह स्पिनर रविचंद्रन अश्विनने भारतीय संघाला परदेशात टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवण्याचं ब्लू प्रिंट दिलं आहे, असं गिलने म्हटलं आहे.
शुबमन गिलला शनिवारी भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं. गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण या सामन्यांमध्ये कोलही आणि रोहितसारखे दिग्गज खेळाडू नसणार आहेत. गिलने रविवारी बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओत म्हटलं, रोहित भाई, विराट भाई आणि अश्विनसारखे खेळाडूंनी आम्हाला असं ब्लू प्रिंट दिलं आहे, ज्यामुळे आम्ही परदेशात होणाऱ्या सामन्यांमध्ये जिंकू शकतो.
हे ही वाचा >> Navi Mumbai : पत्नी घटस्फोट द्यायला टाळाटाळ करायची..पतीने 6 लाखात हत्येची सुपारी दिली, नंतर घडलं भयंकर!
गिलने म्हटलं की, या गोष्टी अंमलात आणणं वेगळी गोष्ट आहे. पण आमच्याकडे जी ब्लू प्रिंट आहे, त्यामुळे आम्हाला परदेशात सामने कसे जिंकायचे, हे माहित झालं आहे. कोहली आणि रोहितच्या कॅप्टन्सीची शैली नक्कीच वेगळी होती. पण त्यांचा उद्देश एकच होता.
काय म्हणाला शुबमन गिल?
शुबमन गिल म्हणाला की, जेव्हा मी लहान होतो, तेव्हा भारतीय क्रिकेटच्या दिग्गज्यांपासून प्रेरित होतो. हे माझ्यासाठी भाग्य आहे की मला विराट भाई आणि रोहित भाई सारख्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. दोघांची स्टाईल खूप वेगळी होती. पण हे पाहणं खूप प्रेरणदायी होतं की, दोघेही एका टार्गेटच्या दिशेनं काम करत होते.
हे ही वाचा >> पुण्यात खळबळ! आईसह पोटच्या लेकरांची केली निर्घृण हत्या! नंतर पेट्रोल टाकून जाळलं, पण नंतर...
एक कर्णधार म्हणून तुम्हाला जिंकायचं असतं आणि तुमची शैली वेगळी असू शकते. दोघांमध्ये खूप फरक होता. पण ते त्यांच्या स्ट्राईमध्ये एकसारखे सुद्धा होते. विराट भाई नेहमी आक्रमक राहायचे. नेतृत्वात भूख आणि इच्छाशक्ती दिसायची. रोहित शर्माही मैदानात खूप सक्रिय होते.