Mumbai Rain: मुंबईत भयंकर पाऊस, मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प!
Mumbai Heavy Rain: मुंबईत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. ज्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. दुसरीकडे आयएमडीने पुढील 12 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईत मागील सहा तासात तुफान पाऊस
100 मिमीपेक्षा अधिक पाऊस बरसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं
मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प
Mumbai Rain Update: मुंबई: मुंबई आणि उपनगरात मागील काही तासांपासून प्रचंड मुसळधार पाऊस कोसळत आहे. ज्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मुंबईची लाइफलाइन असणारी लोकल सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन ट्रेनची वाहतूक तूर्तास बंद आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक ही विक्रोळी आणि भांडूप मार्गावर पाणी साचल्याने सुरू नसल्याची माहिती मिळते आहे. (terrible rain in mumbai central and harbor railways stopped meteorological department issued red alert)
हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याने (IMD) बुधवार आणि गुरुवारी दोन दिवसांसाठी अत्यंत मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त, BMC यांनी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना तातडीच्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आज रात्री IMD ने जारी केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, सर्व सहाय्यक आयुक्त यांना विनंती करण्यात आली आहे की वॉर्डच्या कार्यकारी अभियंत्याला वॉर्ड कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहावे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
गुरुवारी सकाळपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला
IMD ने उद्या सकाळी 8.30 पर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने “25 आणि 26 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, 26 सप्टेंबरला गुजरातमध्ये आणि 26 सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.” IMD ने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार आणि शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सायंकाळी 5.30 ते 8.30 या वेळेत मुंबईतील विविध भागात 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.
- मुलुंड : 104 मिमी
- पवई: 145 मिमी
- चेंबूर: 162 मिमी
- घाटकोपर: 182 मिमी
- शिवडी : 127 मिमी
- वडाळा : 110 मिमी
- वरळी: 53 मिमी
- ग्रँट रोड: 74 मिमी
ADVERTISEMENT
राज्यातील काही जिह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT