आधी त्याने कुत्र्याला मारहाण केली, नंतर ठार करत डोळे काढत गोट्या खेळू लागला अन्...

मुंबई तक

Thane Crime : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली आणि नंतर ठार केले. तो एवढ्यावरच न थांबता त्याने त्या कुत्र्याचे डोळेही काढले आणि नंतर तो घटनास्थळी गोट्या खेळू लागला होता.

ADVERTISEMENT

thane crime
thane crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंब्र्यात भटक्या कुत्र्याला मारहाण

point

घटना मंगळवारी घडल्याचं दिसून आलं

point

नेमकं काय घडलं?

Thane Crime : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली आणि नंतर ठार केले. तो एवढ्यावरच न थांबता त्याने त्या कुत्र्याचे डोळेही काढले आणि नंतर तो घटनास्थळी गोट्या खेळू लागला होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडल्याचं दिसून आलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : 'जयंत पाटील हे राजारामबापू यांची औलाद, काही तरी गडबड... ' गोपीचंद पडळकरांच्या 'त्या' वक्तव्याने शरद पवार गट आक्रमक

आरोपीचा कुत्र्यावर हल्ला 

उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रस्त्यावरील एका कुत्र्यावर हल्ला केला आणि नंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तेव्हाच त्या व्यक्तीने त्याचा एक डोळा काढून टाकला. त्यानंतर तो डोळ्याशी खेळू लागला. ही घटना उघडकीस येताच प्राणी कल्याण संघटना देखील सक्रिय देखील झाल्या असल्याचा पोलिसांवर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

संबंधित घटनेने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे, ज्यामुळे आरोपी कुत्र्याचा मृतदेहाजवळ बसून त्याच्या डोळ्याशी खेळताना दिसत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर काही संघटना सक्रिय झालेल्या आहेत.

हे ही वाचा : अहिल्यानगर हादरलं! नातेवाईकाचे तीन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार, चौथ्या विवाहित बहिणीला देखील सोडलं नाही

आरोपींवर कठोर कारवाई

संबंधित प्रकरणाची पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मुंब्रा पोलिसांनी आरोवींविरुद्ध भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 325 आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp