‘पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो…’, उद्धव ठाकरेंचं पुन्हा अमित शाहांकडे बोट
Uddhav Thackeray vs Amit Shah : “आज जे भाजपचे जुने कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आहेत त्यांना इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहे ते घडले नसते. पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय”, असं म्हणत शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. यावेळी ठाकरेंनी अमित शाहांचं नाव घेत पुन्हा एकदा भाजपवर सत्तावाटपाचं […]
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray vs Amit Shah : “आज जे भाजपचे जुने कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आहेत त्यांना इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहे ते घडले नसते. पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय”, असं म्हणत शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. यावेळी ठाकरेंनी अमित शाहांचं नाव घेत पुन्हा एकदा भाजपवर सत्तावाटपाचं वचन मोडल्याचा ठपका ठेवला.
ADVERTISEMENT
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंनी यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “अमित शहा आणि माझे ठरले होते. त्यांनी कितीही नाही म्हणोत, मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर हे बोललो आहे. आता पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री ठरला होता”, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला.
वाचा >> ‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण शेतकऱ्यांच्या अडचणींचे काय? मला मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी रात्री झालेली बैठक शेतकऱ्यांच्या हिताची असती तर बरे झाले असते. भाजप हेराफेरीचे राजकारण करत आहे. महाराष्ट्र आमचा आहे.”
“सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीत राहूनच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतलाच, तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, तिथे दाद मागू”, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय येण्यापूर्वीच मांडली आहे.
हे वाचलं का?
भुजबळांवरून ठाकरेंचा टोला
बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसता, असं म्हणत भाजपकडून सातत्याने उद्धव ठाकरेंना जात होतं. त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी भाजपला कात्रीत पकडलं. ठाकरे म्हणाले, “बाळासाहेबांना भुजबळांनी अटक केली, आज भाजप त्यांच्यासोबत आहे.”
उद्धव ठाकरेंना वर्षभरापूर्वी बसला झटका
जून 2022 मध्ये मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठा हादरा बसला. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 16 आमदारांनी बंड केलं. त्यानंतर आणखी आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले. त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं.
ADVERTISEMENT
वाचा >> भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि 13 खासदारांच्या समर्थनासह थेट शिवसेनेवरच दावा ठोकला. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वाधिक लोकप्रतिनिधी शिंदे यांच्या बाजूने असल्याच्या निकषावर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले. उद्धव ठाकरेंना वर्षभराच्या काळातच दोन धक्के बसले. पहिला म्हणजे सत्ता गेली आणि दुसरा म्हणजे पक्षही गेला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT