Shiv Sena : ‘शिंदें’ना झटका, ‘ठाकरें’चा विजय! हायकोर्टामुळे कुलूप उघडलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra political News : Eknath shinde faction get set back in bombay high court. uddhav Thackeray group win case
Maharashtra political News : Eknath shinde faction get set back in bombay high court. uddhav Thackeray group win case
social share
google news

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरे आणि शिंदेंमध्ये सुप्रीम कोर्टात सत्तेचा संघर्ष चालला. सेना कुणाची या वादात निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूने कौल दिला. पण शाखा कुणाची, कार्यालयं कुणाची यावरून दोन्ही गट आमनेसामने आलेत. अशाच एका संघर्षात ठाकरेंचा मोठा विजय झालाय. शिंदेंना मोठा झटका बसलाय. हायकोर्टात नेमकं काय झालं आणि त्यामुळे ठाकरे गटाचं मनोबल कसं उंचावलंय, हेच बघणार आहोत.

ADVERTISEMENT

ठाकरे-शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची शाखांसाठी भांडणं

वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आले. कोर्टकज्जा सुरू झाला. सत्तासंघर्षाचा निकाल आला. शिंदेंचं मुख्यमंत्री कायम राहिलं. दुसरीकडे निवडणूक आयोगानंही शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंनाच दिलं. पण शाखा कुणाची, कार्यालयं कुणीची हा वाद तसाच राहिला. यावरून रस्त्यावरचा संघर्षही बघायला मिळाला. एकमेकांच्या शाखांवर तोडक कारवाईही करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिंदेंना मोठा झटका बसलाय. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच ठाकरे गटाचा मोठा विजय झालाय.

हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?

सुरुवातीलाच आपण नेमकं प्रकरण काय हे बघूया…

शिवसेनेच्या वेगवेगळ्या अंगीकृत संघटना आहेत. यापैकीच एक म्युनिसिपल कर्मचारी सेना आहे. नाशिक महापालिकेच्या राजीव भवन या इमारतीत कर्मचारी सेनेचं कार्यालय आहे. शिंदे गटानं याच कार्यालयावर दावा ठोकला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> NCP: भाकरी फिरवली अन् अजित पवारांचा फोटो गायब, शरद पवारांच्या मनात काय?

संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमेंनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरेंनी तिदमेंची हकालपट्टी करत सुधाकर बडगुजर यांना सूत्रं दिली. बडगुजर यांनी कार्यालयात जाऊन तात्काळ पदभारही स्वीकारला. पण याच प्रवेशाला तिदमेंनी आक्षेप घेतला. ठाकरे गटातील व्यक्तींनी अनधिकृतरित्या कुलूप तोडून प्रवेश केला, महत्वाची कागदपत्रं गायब केली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्यामुळे नाशिक पोलिसांनी तात्काळ या ऑफिसला टाळं ठोकलं.

मुंबई उच्च न्यायालायात ठाकरेंच्या बाजूने निकाल

नंतर हेच प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने निकाल दिला. यात ठाकरे गटाचा मोठा विजय झाला. तर शिंदे गटाला धक्का बसला. हायकोर्टाच्या निकालानं ठाकरे गटाला कर्मचारी सेनेचं कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शाखांवरून दोन गट आमनेसामने आलेले असतानाच हायकोर्टातून मिळालेला हा दिलासा ठाकरेंसाठी मनोबल उंचावणारा असल्याचं म्हटलं जातंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT