Prahlad Patel: भीषण अपघात, केंद्रीय मंत्री थोडक्यात बचावले; दुचाकीस्वाराची दुर्दैवी मृत्यू
सध्या मध्य प्रदेशातील विधान परिषदेच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजप आमदार, खासदार आणि मंत्री मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र जनसंपर्क अभियान राबवून परत असताना मंत्री पटेल यांच्या कारला अपघात झाला आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
MP Accident : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (Union Minister Prahlad Patel) यांच्या वाहनाचा मंगळवारी भीषण अपघात झाला. मात्र त्यावेळी ते थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून अपघातात मात्र 35 वर्षाचा तरुणाचा जागीच मृत्यू (Young Boy Death) झाला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. केंद्रीय मंत्री पटेल यांच्या वाहनांचा ताफा छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार रस्त्याकडेला जात हा अपघात झाला आहे. या अपघातात मात्र दुचाकीवर असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. (union minister pralhad patel narrowly escapes road accident one dead three injured)
ADVERTISEMENT
जनसंपर्क अभियानातच अपघात
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकासाठी केंद्रीय मंत्री पटेल सध्या मध्य प्रदेशातील दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते छिंदवाडा येथील जनसंपर्क अभियाना आटोपून ते नरसिंगपूरला परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. तर प्रल्हाद पटेल यांची नरसिंगपूरमधून उमेदवारी आहे. त्यामुळे सध्या ते मध्य प्रदेश दौऱ्यावर होते.
हे ही वाचा>> चहासाठी डॉक्टरने ऑपरेशनच सोडलं अर्धवट, नागपूरमधील खळबळजनक घटना
पटेलांना मिळाले सलग मंत्री पद
प्रल्हाद सिंग पटेल हे 7 जुलै 2021 पासून ते अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशातील दमोह लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. प्रल्हाद सिंग पटेल हे 1989 मध्ये पहिल्यांदा 9 व्या लोकसभेसाठी निवडून आले होते आणि 1996 मध्ये 11व्या लोकसभेसाठी तर 1999 मध्ये 13 व्या लोकसभेसाठी बालाघाटमधून, 2014 मध्ये 16व्या लोकसभेसाठी आणि 2019 मध्ये दमोहमधून ते निवडून आले होते. भाजपच्या तिकिटावर ते पहिल्यांदाच मध्य प्रदेश मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मे 2019 मध्ये, पटेल हे सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री त्यावेळी त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार देण्यात आला होता.
हे वाचलं का?
लोकांनी व्यक्त केला रोष
मंत्री पटेल यांच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच कारच्या वाहनात दुचाकीस्वार ठार झाल्याने अनेक लोकांनी या अपघातानंतर रोषही व्यक्त केला. त्यामुळे काही काळ हे वातावरण तंग बनले होते. काही काळानंतर मृत तरुणासह जखमी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात तरुण ठार झाल्याने काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हे ही वाचा>>‘आज महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची गरज होती’, ‘हा’ मराठी अभिनेता थेटच बोलला!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT