Mumbai Plane Crash Video: मुंबई विमानतळावर 8 प्रवाशांसह चार्टर विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

video charter plane crash on mumbai airport runway there would have been a total of 8 people in the aircraft including both crew members
video charter plane crash on mumbai airport runway there would have been a total of 8 people in the aircraft including both crew members
social share
google news

Mumbai Airport Plane Crash: मुंबई: मुंबईत (Mumbai) मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे एक चार्टर विमान मुंबई विमानतळाच्या (Mumbai Airport) धावपट्टीवर कोसळल्याची (Plane Crash) धक्कादायक घटना काही वेळापूर्वीच घडली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर एकच गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रू मेंबरसह एकूण आठ जण होते. ज्यापैकी तीन जण जखमी झाल्याचं समजतं आहे. विमानात एकही व्हीआयपी उपस्थित नव्हता असे सांगण्यात येत आहे. पण हे चार्टर विमान नेमकं कसं घसरलं याचा आता तपास सुरू आहे. (video charter plane crash on mumbai airport runway there would have been a total of 8 people in the aircraft including both crew members)

डीजीसीएच्या सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. वास्तविक, मुंबई विमानतळावर रनवे-27 वर उतरताना व्हीटी-डीबीएल चार्टर अचानक बंद पडलं. यावेळी विमानात 06 प्रवासी आणि 02 क्रू मेंबर्स होते. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता फक्त 700 मीटर होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Bademiya: हे काय… मुंबईतील प्रसिद्ध ‘बडेमिया’च्या किचनमध्ये उंदीर-झुरळं, FDA ही अवाक्

नेमकं काय घडलं?

या घटनेची माहिती तातडीने मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी 5.45 वाजता घडली. या अपघातात खासगी चार्टर विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर एमएफबी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. या अपघातात तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Tak (@mumbaitak)

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Shiv Sena MLA : शिंदे विरुद्ध ठाकरे! विधानसभा अध्यक्षाच्या कोर्टात काय झालं?

ADVERTISEMENT

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की सर्वत्र धुके आहे आणि दृश्यमानता खूपच कमी आहे. तसेच, या घटनेनंतर एक विमान धावपट्टीच्या बाजूला पडलेले दिसत आहे. जिथे अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी हजर आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT