नाशिकमध्ये मध्यरात्री घडलं तरी काय? दगडफेक, तोडफोड अन्... 'त्या' दर्ग्यावरून तुफान राडा

मुंबई तक

नाशिकच्या काठे गल्लीत अनधिकृत दर्गा तोडकामाच्या आधी मोठा हिंसाचार झाला. यावेळी एका मोठ्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये मध्यरात्री घडलं तरी काय?
नाशिकमध्ये मध्यरात्री घडलं तरी काय?
social share
google news

प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला आज (16 एप्रिल) पहाटे सुरुवात झाली. मात्र, या कारवाईआधी मध्यरात्री या भागात तुफान राडा झाला. येथे जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक करून हिंसाचार घडवला. या घटनेत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दगडफेकीतील 15 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील एका अनधिकृत दर्ग्याला नाशिक महानगरपालिकेने (NMC) 1 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. या दर्ग्याची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला या बांधकामाबाबत उच्च न्यायालयात कोणतेही पुरावे सादर करता आले नव्हते. त्यामुळे मनपाकडून हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली होती. पण ट्रस्टकडून ही नोटीस गांभीर्याने घेण्यात आली नाही. ज्यानंतर आज पहाटे साडेपाच वाजता तोडकामाला सुरुवात करण्यात आली. या कारवाईसाठी मनपा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम आखली होती.

हे ही वाचा>> Nagpur Violence: औरंगजेबच्या कबरीबाबत RSS मोठं विधान, सर्वांच्या भुवया उंचावल्या

हिंसाचाराचा भडका

दरम्यान, हे अनधिकृत बांधकाम तोडकामापूर्वी मध्यरात्री परिसरात वीजपुरवठा खंडित झाली. त्याचेवळी या दर्ग्याबाबत काही समाजकंटकाकडून अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, परंतु अचानक या ठिकाणी लोकांचा जमाव आला आणि त्यांनी थेट पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. तसंच परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. ही हिंसक परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ सौम्य बळाचा वापर केला. यावेळी काही अश्रुधुराच्या नळकांड्या देखील पोलिसांना फोडाव्या लागल्या.

हे ही वाचा>> Nagpur Violence : दंगलीची पोस्ट, बांगलादेश ते थेट फेसबूक कंपनीशी संपर्क... नागपूर सायबरसेलनं सगळंच काढलं

मिळालेल्या माहितीनुसार, या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहे. ज्यामध्ये 4 अधिकारी आणि 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  दगडफेक करणाऱ्या १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त जमावाची समजूत काढण्यासाठी या दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांना बोलावण्यात आले होते, परंतु त्यांनाही जमावाने जुमानले नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp