Gautami Patil : ‘पाटील’ आडनाव बदलावं? गौतमीच्या गावातील लोक म्हणतात…
गौतमी पाटीलने आडनाव बदलावे अशी मागणी केली गेली. यावरून वाद सुरू असून, तिच्या गावातील लोकांनी गौतमीला पाठिंबा दिला आहे. आडनाव बदलणार नाही, असं तिच्या आजोबांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
-विशाल ठाकूर, धुळे
ADVERTISEMENT
‘सबसे कातील गौतमी पाटील’, ही घोषणा आता महाराष्ट्रभर गेलीये. नृत्य आणि दिलखेच अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचे कार्यक्रम नेहमीच वादात सापडलेत. पण, सध्या गौतमी अडचणीत आलीये ती पाटील आडनावावरून. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होत आहे. त्यामुळे तिने पाटील आडनाव लावू नये, अशी मागणी एका संघटनेकडून करण्यात आली. तर ‘मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी वापरणार’, अशी भूमिका गौतमीने यावर मांडली. त्यानंतर मुंबई Tak ने गौतमीच्या गावात जाऊन तिथल्या लोकांशी आणि तिच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यांना काय वाटतं, हेच जाणून घ्या…
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या गावात गौतमी पाटील लहानाची मोठी झाली आहे. याच गावात तिचं बालपण गेलं. शिक्षण झालं. इथूनच तिच्या नृत्यातील करिअरची सुरुवात झाली. या गावात सध्या गौतमीचे मामा राहतात. पण तेही सध्या पुण्याला स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांचं घर सध्या कुलूपबंद अवस्थेत आहे.
हे वाचलं का?
गौतम पाटीलच्या गावातील नागरिक काय म्हणाले?
मुंबई Tak ने गौतमीच्या गावातील नागरिकांशी संवाद साधला. तिच्या आडनावावरून सुरू झालेल्या वादावर ग्रामस्थांनी तिची बाजू घेतली. कला आणि जात या स्वतंत्र गोष्टी आहे. जातीशी कलेला जोडू नये, असे स्थानिकांनी मांडले.
हेही वाचा >> राष्ट्रवादी की काँग्रेस, पुण्यात वरचढ कोण; आकड्यात समजून घ्या कुणाची ताकद जास्त?
‘गौतमी पाटीलच्या आईची जेव्हा प्रकृती घालवली होती, तेव्हा समाज कुठे गेला होता? आज गौतमी पाटीलचे नाव वरच्या स्तरावर जात असल्याने याचा समाज विरोध करू लागला आहे’, अशी भूमिका शिंदखेडा येथील नागरिकांनी मांडली.
ADVERTISEMENT
गौतमीचे आडनाव आधीपासूनच ‘पाटील’
गौतमी पाटीलचा जन्म पाटील घरातच झाला असून, ते पाटील नावच पुढेही कायम ठेवतील, असं शिंदखेडा येथील नातेवाईकांनी सांगितले.
ADVERTISEMENT
“कलेला जातीवरून विरोध करू नका”
“गौतमी ही मूळात पाटील कुटुंबातच जन्माला आलेली आहे. तिच्या नावापुढे चाबुकस्वार लावा, असे म्हणणे चुकीचे आहे. गौतमी ही पाटील आडनावच लावेल. त्यामुळे तिच्या कलेला कोणी विरोध करू नये”, असे शिंदखेडा येथील गौतमी पाटीलचे चुलत आजोबा प्रशांत पाटील म्हणाले.
“गौतमीच्या हलाखीच्या परिस्थितीत समाज कुठे गेला होता”
“गौतमी पाटील 96 कुळी मराठा आहे. ती पाटील घरातच जन्मलेली आहे. गौतमी पाटीलची हलाखीची परिस्थिती असताना आणि तिच्या आईची प्रकृती खालावलेली होती, तेव्हा समाज कुठे गेला होता? आज ती तिच्या कलेच्या माध्यमातून पुढे जात आहे, तर केवळ पाटील नावारून विरोध केला जात आहे. प्रत्येकांची कला ही वेगवेगळी आहे. कला सादरीकरण करणे हे प्रत्येकाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पाटील नावावरून गौतमीला विरोध करणे हे चुकीच आहे”, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अरुण देसले यांनी मांडली.
हेही वाचा >> Crime: सपासप.. चाकूचे 40 वार नंतर दगडाने केला 16 वर्षाच्या गर्लफ्रेंडचा चेंदामेंदा
अश्लील नृत्यावर बोट…
“गौतमी पाटीलला जर महाराष्ट्रात प्रसिद्धी हवी असेल, तर तिने पाटील हे आडनाव वापरू नये. कारण ती नृत्यामधून अश्लील चाळे करते. त्यामुळे ते नृत्य आमच्या समाजात कलंक आहे”, असं मत गौतमी पाटीलच्या गावातील एका नागरिकाने मांडले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT