अखंड भारताचा नकाशा, मोर, कमळ अन्… नवीन संसद भवनात काय आहे खास?
नवीन संसद भवनात लोकसभेच्या 888 जागा आहेत आणि अभ्यागत गॅलरीत 336 पेक्षा जास्त लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. नवीन संसद भवनाची रचना त्रिकोणी आकारात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्यही आहे. त्यात संस्कृती आहे तसंच संविधानाचा स्वरही आहे. देशातील विविध भागांतील विविधतेचा या नव्या इमारतीत समावेश करण्यात आला आहे, असं ते म्हणाले.
देशाच्या नव्या संसदेत अखंड भारताचा नकाशा, आंबेडकर-सरदार पटेल, चाणक्य यांच्या पुतळ्यासह अशा अनेक गोष्टी कोरण्यात आल्या आहेत, ज्या पाहून देशवासीयांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकसभेचा आतील भाग हा राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारित आहे, तर राज्यसभेचा भाग हा राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे आणि राष्ट्रीय वृक्ष वड हा देखील संसदेच्या प्रांगणात आहे.
नवीन संसद भवनात काय आहे?
भाजपचे संघटन मंत्री बीएल संतोष यांनी ट्विट केलं आहे. यात संसदेतील आतील भाग कसा आहे, त्याचे फोटो आहे. ही केवळ इमारत नाही. हे भारताच्या अभिमानास्पद सभ्यतेला पुढे नेणार आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. बीएल संतोष यांनी काही फोटो आपल्या ट्विटमध्ये शेअर केले आहेत.
हेही वाचा >> ‘तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर सेक्स…’, बहिणीच्या नवऱ्यानेच 8 महिने केला रेप
