DRDO: पाक ललनेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला प्रदीप कुरूळकर आहे तरी कोण?
DRDO चा संचालक प्रदीप कुरूळकर याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या प्रदीप कुरूळकर आहे तरी कोण
ADVERTISEMENT

Pradeep Kurulkar: पुणे: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चा शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली काहीच दिवसांपूर्वी पुण्यातून अटक केली आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील डीआरडीओ संचालक (अभियंता) शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर (वय 60 वर्ष) याला हनी ट्रॅप प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. (who is drdo scientist pradeep kurulkar caught in the honey trap of a pakistani woman)
पुण्यातील डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर हा त्याच्या व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला माहिती देत असल्याचं ATS ने म्हटले आहे. प्रदीप कुरूळकर हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या (पीआयओ) अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.
एका जबाबदार पदावर असूनही, DRDO शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर याने संवेदनशील सरकारी गुपितांशी तडजोड करून आपल्या पदाचा गैरवापर केला, जे शत्रू देशाच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. अशी माहिती ATS च्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
महाराष्ट्र एटीएसने मुंबईत अधिकृत गुप्तता कायदा 1923 आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हाही नोंदवला आहे. डीआरडीओने केलेल्या तक्रारीनंतर तपास सुरू करण्यात आल्याचा एटीएसचा दावा आहे. प्रदीप कुरूळकर याला बुधवारी अटक करण्यात आली होती.