Sudhakar Badgujar : सलीम कुत्तासोबत डान्स, कोण आहे शिवसेना UBTचे बडगुजर?
सुधाकर बडगुजर हे नाशिकचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी असून बडगुजर यांची चौकशी करा, अशी मागणी सभागृहात नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
ADVERTISEMENT

-प्रवीण ठाकरे, नाशिक
Sudhakar Badgujar News in Marathi : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे व्हिडीओच विधानसभा अध्यक्षांकडे दिला. बडगुजर हे 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स करत आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला असून, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची चौकशी करण्याची घोषणा केली. यामुळे सुधाकर बडगुजर चर्चेत आले आहेत. जाणून घ्या त्यांच्याबद्दल…
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द 2007 पासून सुरू झाली. त्याआधी त्यांची बडगुजर आणि कंपनी ही ठेकेदारी फर्म होती. त्यांनी जवळपास 6 वर्षे नाशिक महापालिका आणि पंचायत समितीमध्ये ठेकेदार म्हणून काम केले. नंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले.
हेही वाचा >> Manoj Jarange : “…ते मराठा आरक्षण टिकणार नाही”, जरांगेंचं मोठं विधान
2007 मध्ये सुधाकर बडगुजर नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते.