IAS Sujata Saunik : महाराष्ट्राला मिळाली पहिली महिला मुख्य सचिव, कोण आहेत सौनिक?
IAS Sujata Saunik News : नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती.
ADVERTISEMENT
Who is Sujata Saunik : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी IAS सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या सुजाता सौनिक या पहिला महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुजाता सौनिक (sujata saunik) यांनी रविवारी (आज) मुंबईतील मंत्रालय येथे मावळते मुख्य सचिव नितीन करीर (Nitin Kareer) यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. दरम्यान आता महाराष्ट्राला मिळालेल्या पहिला महिला मुख्य सचिव नेमक्या कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (who is sujata saunik appointed as chief secretary of maharashtra become first women chief secretary)
ADVERTISEMENT
नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण राज्य सरकारकडून तसे न करता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे ही वाचा : ''निवृत्तीचा विचार नव्हता पण...'', रोहित शर्मा असं का म्हणाला?
कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक या 1987 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत.
हे वाचलं का?
सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय.
कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
ADVERTISEMENT
सुजाता यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे या पदावार काम करणारे पहिले पती-पत्नी म्हणून देखील त्यांची ओळख असणार आहे.
ADVERTISEMENT
सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे.
हे ही वाचा : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, अख्खं कुटुंब भुशी डॅममध्ये...काय घडलं?
सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. त्या जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत.
दरम्यान सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT