मृतदेहासोबत केला 600 Km प्रवास, प्रवाशांनी भीत भीत काढली रात्र

मुंबई तक

तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या जनरल डब्यातील प्रवाशांना एका धक्कादायक प्रकारला सामोरे जावे लागले. प्रवास करत असताना एका प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याने त्या मृतदेहाबरोबर प्रवाशांना 600 किलो मीटरचा प्रवास करत आपला प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासात मात्र रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

tamilnadu sampark kranti express railway passenger traveling dead body 600 kilometers train jhansi station
tamilnadu sampark kranti express railway passenger traveling dead body 600 kilometers train jhansi station
social share
google news

Traveling with dead body : तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या (Tamil Nadu Sampark Kranti Express) जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका घटनेमुळे धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. रेल्वेच्या डब्यात मृतदेहासह (dead body) अनेक प्रवाशांना 600 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे अनेक जणांनी भीत भीत प्रवास केला आहे. मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाला (Railway Administration) मृतदेह उतरवण्याची विनंती करण्यात आली मात्र त्याला कोणताही प्रतिसाद रेल्वे प्रशासनाकडून मिळाला नाही.

रेल्वेतच मृतदेह

चेन्नईहून हजरत निजामुद्दीनला जाणारी ट्रेन 6 नोव्हेंबर रोजी झाशी स्थानकावर पोहचली होती. त्यावेळी रेल्वेच्या डब्यातून एक मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्यानंतर पंचनामा करुन तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ही घटना घडल्यानंतर मात्र रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा मृतदेह याआधीच उतरवला पाहिजे होता मात्र 10 तासांपेक्षा जास्त उशीर मृतदेह रेल्वेतच पडून असल्याने अनेक जणांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली.

आजारपणातच केला प्रवास

रेल्वेतून जो मृतदेह उतरवण्यात आला, त्यांचे नाव रामजीत यादव असे आहे. ते बांदा जिल्ह्यातील कमसिन पोलीस स्टेशन परिसरात राहणारे होते. चेन्नईमध्ये रामजीत बांधकामाचे काम करत होते. मात्र ते काही दिवसांपासून आजारी होते, त्यामुळे ते नातेवाईकासोबत तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून घरी जात होते.

हे ही वाचा >>Prahlad Patel: भीषण अपघात, केंद्रीय मंत्री थोडक्यात बचावले; दुचाकीस्वाराची दुर्दैवी मृत्यू

तब्येत अचानक बिघडली

गोवर्धन यांनी सांगितले की, रविवारी रात्री ट्रेन नागपूरला पोहोचली होती. तेव्हा रामजीत यांची तब्येत अचानक बिघडली. मात्र त्यांच्यावर उपचार करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. रामजीत यांच्या हृदयाचे ठोके तपासण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर (139) फोन करण्यात आला मात्र त्यानंतर कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp