नाशिकमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात, 6 मजुरांचा जागीच मृत्यू

मुंबई तक

नाशिक: नाशिकच्या मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉली अचानक उलटल्याने हा अपघात झाला. ज्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. संगमनेर (ता.दिंडोरी) येथून कनाशी येथे जात असताना हा अपघात झाला. मजुरांनी भरलेला ट्रॅक्टरवरील चालकाचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नाशिक: नाशिकच्या मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉली अचानक उलटल्याने हा अपघात झाला. ज्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

संगमनेर (ता.दिंडोरी) येथून कनाशी येथे जात असताना हा अपघात झाला. मजुरांनी भरलेला ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. ज्यामध्ये असलेल्या १७ जणांपैकी सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस तसेच ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात आणलं. हे सर्व जण जळगाव जिल्ह्यातील असून रस्त्याचे काम करणारे मजूर होते. ज्यांचा कनाशीकडे जाताना अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काही गंभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वणी शहरातील खाजगी डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार करत आहे. पाच ते सहा गंभीर जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp