Varsha Gaikwad: करा तयारी शाळेची! राज्यातील शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा
Varsha Gaikwad: करा तयारी शाळेची! राज्यातील शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर
Varsha Gaikwad has announced to reopen schools in Maharashtra after summer vacation

देशात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर होत होता. शाळाही बंदच होत्या. त्या सुरू झाल्या पण पूर्णवेळ नाहीच. अशा सगळ्याता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा कधी सुरू होणार याची तारीख जाहीर केली आहे. शाळा आणि महाविद्यालयं बंद होती. ऑनलाईन शिक्षण अनेक दिवस सुरू होतं. अशात आता शाळा सुरू करण्याची तारीख वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली.

Varsha Gaikwad has announced to reopen schools in Maharashtra after summer vacation
'स्पेलिंग मिस्टेक' शोधत रामदास आठवलेंनी घेतली शशी थरूर यांची शाळा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील शाळा १५ जून पासून सुरू होणार आहेत. १३ जून रोजी पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा १५ जून पासून सुरू केल्या जाणार आहेत. वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी झाला. २ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्यापासून निर्बंधही संपले तसंच मास्कचीही सक्ती राहिली नाही. अशात गेल्या सात दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात रूग्ण वाढले आहेत. घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र शाळा सुरू होणार की नाही याची चिंता पालकांना आणि विद्यार्थ्यांना लागून राहिली होती अशात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या यांनी१५ जूनपासून राज्यातल्या शाळा सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनचे सर्व नियम पाळूनच वर्ग घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे. असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in