पुणे : ‘गडकरी साहेब, उडत्या बसेस बरोबर पाणबुड्याही घ्या; मनसेच्या वसंत मोरेंनी का केलीये मागणी?
पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उडत्या बसेसची योजना फायदेशीर ठरेल, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरींच्या या विधानाची जोरदार चर्चा झाली. अनेकांनी शंकाही उपस्थित केलेत. याच विधानावर बोट ठेवत मनसेचे वसंत मोरेंनी बोट ठेवलं आणि गडकरींकडे थेट पाणबुड्या घेण्याचीच विनंती केली. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा मुद्दा गेल्या आठवड्यात ऐरणीवर आला. नागरिकांनी […]
ADVERTISEMENT

पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उडत्या बसेसची योजना फायदेशीर ठरेल, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरींच्या या विधानाची जोरदार चर्चा झाली. अनेकांनी शंकाही उपस्थित केलेत. याच विधानावर बोट ठेवत मनसेचे वसंत मोरेंनी बोट ठेवलं आणि गडकरींकडे थेट पाणबुड्या घेण्याचीच विनंती केली.
पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा मुद्दा गेल्या आठवड्यात ऐरणीवर आला. नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. संतप्त नागरिकांनी त्यांची समस्या ऐकवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूल पाडण्याचे तसेच तातडीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाय योजना करण्याचेआदेश दिले.
एकनाथ शिंदे यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकात जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उडत्या बसेसच्या योजनेबद्दल माहिती दिली होती.
पुण्यात लवकरच हवेतून उडणारी बस, वाहतूक कोंडीवर नितीन गडकरींनी सांगितला उपाय