‘जागा आणि वेळ सांगा मी हजर असेन’; विक्रम ठाकरेंनी आमदार देवेंद्र भुयारांविरोधात थोपटले दंड
अमरावतीतल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक झाली. निवडणूक चर्चेत आली ती दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीमुळे. निवडणुकीत झालेल्या या प्रकारावरून आमदार शिवाजी भुयार यांनी तलवारीनं हात छाटण्याचा इशारा दिला. भुयारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर युवक काँग्रेसचे माजी महासचिव विक्रम ठाकरेंनीही दंड थोपटलेत. अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याला राम लकेंसह एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती होती. यावेळी मोर्शी विधानसभा […]
ADVERTISEMENT

अमरावतीतल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक झाली. निवडणूक चर्चेत आली ती दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीमुळे. निवडणुकीत झालेल्या या प्रकारावरून आमदार शिवाजी भुयार यांनी तलवारीनं हात छाटण्याचा इशारा दिला. भुयारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर युवक काँग्रेसचे माजी महासचिव विक्रम ठाकरेंनीही दंड थोपटलेत.
अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याला राम लकेंसह एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती होती. यावेळी मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार मेळाव्याला हजर होते.
देवेंद्र भुयारांनी या मेळाव्यात केलेल्या विधानावरून आता युवक काँग्रेस आक्रमक झालीये. आमदार देवेंद्र भुयारांच्या विधानावर बोट ठेवत युवक काँग्रेसनं थेट पोलीस ठाण्यात तक्रार केलीये. इतकंच नाही, तर विक्रम ठाकरेंनी “जागा तुझी, वेळ तुझा… सांग मी हजर असेन”, भुयारांनाही उलट आव्हान दिलंय.
विक्रम ठाकरे देवेंद्र भुयार यांना म्हणाले की, “माझं तुला आव्हान आहे. मी केदार चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ येतो. जुना देवेंद्र भुयार काय आहे ते दाखव”, असं प्रतिआव्हान ठाकरेंनी दिलंय. त्यामुळे स्थानिक राजकारण चांगलंच तापलंय.