Crime: ‘या’ दोन मुलींच्या हत्येने महाराष्ट्र हादरला, अंगावर काटा आणणारी कहाणी
जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन मुलींची एकाच दिवशी हत्या झाली असून त्यांचे मृतदेह देखील एकाच दिवशी सापडले. या दोन्ही प्रकरणावर थेट विधानसभेत देखील आमदारांनी मुद्दे उपस्थित केले
ADVERTISEMENT

Jalgaon and Ratnagiri Girl Murder Case: 29 जुलै 2023 रोजी जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात ज्या दोन भयंकर घटना घडल्या त्याने अवघ्या महाराष्ट्र हादरून गेला आहे. जळगावमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात एका तरुणीची अत्यंत गूढ पद्धतीने हत्या करुन तिचे संपूर्ण केस काढून तिचा मृतदेह खाडीत फेकल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही घटनांचा नेमका घटनाक्रम कसा होता हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (2 girls were murdered on the same day in jalgaon and ratnagiri districts a heart wrenching story rape and murder case news maharashtra live)
जळगाव– 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 19 वर्षाच्या तरुणाकडून अत्याचार अन् हत्या
जळगाव जिल्ह्यात एका 9 वर्षीय मुलीची अत्याचार करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दिलं आहे. ज्यानंतर जळगावमध्ये आज सर्वपक्षीय संघटनांकडून भडगाव बंदची हाक देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने जळगावमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी आरोपीने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. काल आरोपीला तपासासाठी पोलीस गावात घेऊन गेले. त्यावेळी संतप्त जमावाने त्याच्यावर तुफान दगडफेक केली. या घटनेत तीन पोलीस देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी विधीमंडळात हा मुद्दा देखील मांडला. विधानसभेत हा मुद्दा उपस्थितीत झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पीडितेच्या आई-वडिलांशी संवाद साधला. यावेळी पीडितेच्या आई-वडिलांनी आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी केली.
हे ही वाचा >> Nitin desai आत्महत्या प्रकरणी ‘या’ 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणातील आरोपी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. 29 जुलैच्या दुपारी पीडित मुलगी ही दुपारी घरी एकटीच होती. आरोपीने मुलीला जनावरांच्या गोठ्यात बोलवून घेतलं. आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपी स्वप्नीलने तिचं तोंड दाबून थेट तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्याच केली.