Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amruta Fadnavis, wife of Devendra Fadnavis allegation on designer :

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची ऑफर दिल्याप्रकरणी कथित डिझायनर तरुणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली आहे. आज (गुरुवार) दुपारी तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. धमकी देणे, कट रचणे, लाच देणे अशा आरोपांखाली मलबार हिल पोलिसांनी तिला अटक करण्यात आलं आहे.

उपमुख्यममंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील डिझायरने अमृता फडणवीस यांना विशिष्ट स्वरूपाची माहिती पुरवण्यासाठी आणि वडिलांविरुद्ध असलेला गुन्हा कुमकुमत करण्यासाठी 1 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमृता फडणवीसांची डिझायनरविरुद्ध तक्रार, प्रकरण समजून घ्या…

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी डिझायनरविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला.

अमृता फडणवीस यांनी ज्या डिझायनरवर आरोप केले आहेत, तिचं नाव अनिक्षा असल्याचं एफआयआरमध्ये म्हटलेलं आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ही डिझायनर तब्बल 16 महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. इतकंच नाही, तर ही डिझायनर अमृता फडणवीस यांना त्यांच्या घरी जाऊनही भेटली होती.

ADVERTISEMENT

‘बुकींची माहिती आणि वडिलांचं प्रकरण’, अमृता फडणवीसांचे आरोप काय?

अमृता फडणवीस यांनी फियार्दीत म्हटल्याप्रमाणे अनिक्षाने 1 कोटी रुपये लाच देण्याची ऑफर दिली. अनिक्षाने काही बुकींची माहिती पुरवण्यासाठी आणि तिच्या वडिलांविरुद्ध दाखल असलेला गुन्हा कुमकुवत करण्यासाठी ही ऑफर दिली होती.

ADVERTISEMENT

पुढे अमृता फडणवीसांनी तक्रारीत असाही आरोप केलेला आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी अनिक्षाने एका अज्ञात नंबरवरून तिची व्हिडीओ क्लिप, ऑडिओ मेसेज आणि इतरही मेसेज पाठवले. अनिक्षा तिच्या वडिलांसोबत मिळून अप्रत्यक्षपणे धमकी आणि कट रचत होती. अनिक्षाने तिच्या वडिलांचा उल्लेख दोन आरोपी म्हणून केला होता.

मुंबई पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भादंवि कलम 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कलम 8 भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गाने सरकारी कर्मचाऱ्याला प्रवृत्त करण्यासंदर्भातील आहे. कलम १२ हे गुन्हा करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आहे.

अमृता फडणवीसांनी तक्रारीत असंही म्हटलं आहे की, “अनिक्षाने असा दावा केला होता की ती कपडे, ज्वेलरी आणि फूटवेअर डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेल्या वस्तू सार्वजनिक कार्यक्रमात परिधान कराव्यात, जेणेकरून तिने डिझाईन केलेले कपडे, ज्वेलरी आणि फूटवेअरचं प्रमोशन होईल. मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली आणि मी तिला होकार दिला.”

अमृता फडणवीस त्या डिझायनरला कधी भेटल्या?

अमृता फडणवीसांनी तक्रारीत म्हटलंय की, “ही डिझायनर मला नोव्हेंबर 2021 रोजी भेटली होती. तिला आई नसल्याचं तिने सांगितलं. सर्व कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आपल्यावरच असल्याचं तिने मला सांगितलं. पहिल्या भेटीनंतर अनिक्षा उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर मला भेटायला आली होती.”

“एकदा ती आली आणि तिने मला काही डिझाईन केलेले कपडे आणि ज्वेलरी आमच्या स्टाफमधील एका व्यक्तीकडे दिल्या आणि ते मी परिधान करावेत अशी विनंती केली. ते कपडे मी कधी आणि कुठल्या कार्यक्रमात परिधान केले की नाही, हे मला आठवत नाही. त्या वस्तू माझ्या स्टाफमार्फत मी तिला परत केल्या किंवा दान केल्या. तिच्या वस्तू माझ्याकडे नाहीत”, असंही या तक्रारीत म्हटलेलं आहे.

अमृता फडणवीसांना नेकलेस दिला भेट

तक्रारीत म्हटलं आहे की,”अनिक्षाने एकदा सागर बंगल्यावर मला नोव्हेंबर-डिसेंबर 2022 या कालावधीत नेकलेस भेट दिला. तो नेकलेसही मी कधी कुठल्या कार्यक्रमात घातला नाही. अनिक्षाला वाईट वाटू नये म्हणून आपण तिला एक दोन कार्यक्रमात परिधान केल्याचं सांगितलं आणि तीन आठवड्यात परत केला.”

“एका भेटीवेळी अनिक्षाने सांगितलं की, तिच्या वडिलांचे विविध राजकीय नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत. नंतर तिने आमच्या स्टाफकडे एक लिफाफा दिला आणि तो मला द्यायला सांगितला. जेव्हा मी तो लिफाफा उघडला, तेव्हा त्यात हस्तलिखित नोट होती, पण मला त्या मजकूराचा आशय कळला नाही, मी तो पेपर बाजूला ठेवून दिला.”

“27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातील एका कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होते. तिथे अनिक्षाला बघून मला धक्काच बसला, कारण ती मुंबई राहते. जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली की माझ्या एका कर्मचाऱ्याने तिला कार्यक्रमाचा पास दिला”, असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत म्हटलं आहे.

“मुंबईला परत येत असताना बॉडीगार्डने गाडी थांबवली, तेव्हा तिथे अनिक्षा असल्याचं मी बघितलं. ती खोटं बोलत असल्याचं माहिती असतानाही मी तिला माझ्या गाडीत बसू दिलं कारण मला घाबरवायचं नव्हतं. अनिक्षाने अशी ऑफर दिली की आपण बुकींकडून पैसे कमावू शकतो. एकतर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती त्यांना देऊन वा त्यांच्याकडून कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून आपण पैसे कमावू शकतो,” अशी माहिती अमृता फडणवीसांनी तक्रारीत दिली आहे.

“अनिक्षाची ऑफर ऐकून मी गाडी थांबवायला सांगितली आणि अनिक्षाला खाली उतरायला सांगितलं. ती दुसऱ्या गाडीत बसली आणि ते आमचा पाठलाग करत होते. त्यानंतर तिने केलेल्या कॉल्सकडे मी दुर्लक्ष केलं. 16 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता अनिक्षाने आपल्याला कॉल केला आणि एका गुन्ह्यात तिच्या वडिलांचं नाव असल्याचं सांगितलं. त्यातून त्यांना सोडवण्यासाठी तिने आपल्याला 1 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली. ही ऑफर ऐकून मी लगेच फोन कट केला आणि तिचा नंबर ब्लॉक केला”, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.

“18 फेब्रुवारी रोजी रात्री 11.55 वाजता आणि मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी (19 फेब्रुवारी) मला 22 व्हिडीओ क्लिप्स, तीन ऑडिओ मेसेज आणि इतर मेसेज अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले. माझ्या स्टाफमधील कर्मचाऱ्यालाही त्याच नंबरवरून हे मेसेज आले. त्यानंतर त्याच नंबरवरून 19 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता 40 मेसेज, व्हिडीओ, ऑडिओ मेसेज आणि स्क्रीन शॉट आले. हा मोबाईल क्रमाकं अनिक्षाचा असल्याचं मला कळलं”, असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT