चटणीची पूड टाकून कोयत्याने हल्ला, बीडमध्ये जबरी दरोडा

मुंबई तक

रोहिदास हातागळे, (बीड): बीड जिल्ह्यातील उमराई येथे चटणीची पूड टाकून लोखंडी गज आणि कोयत्याने हल्ला करत घरातील 2 लाख 73 हजार रुपये चोरून नेल्याची धक्कादायक घडली आहे. ही घटना 22 एप्रिल रोजी घडली असून जखमींवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. याप्रकरणी 12 दरोडेखोरांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

रोहिदास हातागळे, (बीड): बीड जिल्ह्यातील उमराई येथे चटणीची पूड टाकून लोखंडी गज आणि कोयत्याने हल्ला करत घरातील 2 लाख 73 हजार रुपये चोरून नेल्याची धक्कादायक घडली आहे. ही घटना 22 एप्रिल रोजी घडली असून जखमींवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. याप्रकरणी 12 दरोडेखोरांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण भीमराव केंद्रे (वय 22 वर्ष) रा. उमराई ता. अंबाजोगाई (बीड) हे घराच्या दारात झोपले असताना अचानक 12 जण घरात घुसले. यावेळी सगळ्यांकडे लोखंडी रॉड, पाईप, गज, लाकडी दांडा, कोयता आणि गाडीची चैन अशी हत्यारं होती.

या मारेकऱ्यांनी लक्ष्मण यांच्या घरात घुसून अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. ‘तुझा भाऊ हा नितीन केंद्रे यांच्यासोबत पोलीस स्टेशनला का गेला?’ असा सवाल करत त्यांनी लक्ष्मण केंद्रे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याचा उद्देशाने यातील हत्याराने १२ जणांनी लक्ष्मण यांच्या हातावर, पोटावर, पाठीवर, खांद्यावर, मांड्यावर सपासप वार केले.

लक्ष्मण केंद्रे हे गंभीर जखमी झालेले असतानाच अनिल किसन केंद्रे याने घरात घुसून त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच जीवे मारून टाका असं चटणीची पूड लक्ष्मण यांच्या डोळ्यात टाकली.