नागपूर : शेअर मार्केटच्या नादात मुलाने घरावरच मारला डल्ला, ७३ लाखांची चोरी

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने २४ तासात लावला घरफोडीचा छडा
boy from Nagpur Theft of His own house For Stock Market Investment police Arrested the Guy
boy from Nagpur Theft of His own house For Stock Market Investment police Arrested the Guy

नागपुरातील शांतीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी जावेद अब्दुल थारा यांच्या घरी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटात ठेवलेले १३ लाख रुपये रोख आणि ६० लाख रुपयांचे दागिने असा एकूण ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला होता.

चोरीची रक्कम ही मोठी असल्यामुळे नागपूर शहर गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. याप्रकरणी नागपूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना जी माहिती मिळाली ती अत्यंत धक्कादायक होती, कारण ज्या ठिकाण वरून 13 लाख रुपये रोख आणि साठ लाख रुपयांचा सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल चोरी गेला होता ते इलेक्ट्रॉनिक लॉकर होते, त्यामुळे या लॉकर चा कोड माहिती असणाऱ्यांनीच ही चोरी केली असावी अशी शंका गुन्हे शाखेच्या पोलिसांना आले. त्यानुसार त्यांनी जावेद अब्दुल रजाक थारा यांच्या दुकानातील कामगार आरोपी वाजीद गफूर अली याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली दिली.

त्याने जाफरने पैशाची पिशवी आपणास दिल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितले त्यानुसार गुन्हे शाखेने जावेद थारा यास अटक केली. तसेच वाजीद गफूर आली हे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.

जाफर जावेद थारा हा जावेद अब्दुल थारा यांचा मुलगा असून त्याने शेअर मार्केटच्या नादात आपल्याच घरी 73 लाखाचा डल्ला मारल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे. इतकेच नव्हे तर घरी डल्ला मारलेल्या रोख रकमेतून सौदी अरेबियाला पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न असल्याची माहिती सुद्धा नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in