गळा आवळून हत्या केली, नंतर कपडे उतरवून...; भावाने बहिणीसोबत केलेल्या कृत्याने सगळेच हादरले - Mumbai Tak - brother killed sister sexually assault and her murder britain crime story - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

गळा आवळून हत्या केली, नंतर कपडे उतरवून…; भावाने बहिणीसोबत केलेल्या कृत्याने सगळेच हादरले

एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. बहिणीच्या हत्येनंतर भावाने सोशल मीडियावर (Social media) स्टेटस ठेवून दु:ख व्यक्त केले होते.मात्र भावाचे हे दु:ख निव्वळ दिखावा असल्याचे आता समोर आले आहे.
Updated At: Jul 27, 2023 16:56 PM
brother killed sister sexually assault and her murder britain crime story

Crime News In marathi : बहिण-भावाचं नातं नेहमीच खूप खास आणि घट्ट असते. पण या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. बहिणीच्या हत्येनंतर भावाने सोशल मीडियावर (Social media) स्टेटस ठेवून दु:ख व्यक्त केले होते.मात्र भावाचे हे दु:ख निव्वळ दिखावा असल्याचे आता समोर आले आहे. कारण मोठ्या भावानेच (brother) बहिणीची (Sister) हत्या करत करून तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांनी (Police) तपासातून उघड केले आहे.त्यामुळे कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे. (brother killed sister sexually assault and her murder britain crime story)

फेसबुकवर भावनिक पोस्ट

द सनच्या रिपोर्टनुसार, एंबर गिबसन नावाच्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या करत तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. ब्रिटेनच्या लैनार्कशायरमध्ये 26 नोव्हेंबर 2021 रोजी ही घटना घडली होती. या हत्येनंतर 20 वर्षीय भाऊ कॉनर गिबसन याने फेसबुक एक स्टेटस ठेवले होते. ”एंबर, आम्हाला तुझी आठवण य़ेईल”. ”खासकरून मला”. ”मी तुझ्यावर प्रेम करतो, तुर्तास अलविदा” असा मेसेज लिहत कॉनरने बहिणीला श्रद्धांजली व्यक्त केली होती.

हे ही वाचा : Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याच्या हत्येपूर्वी काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एंबर गिबसन नावाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना 26 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता 28 नोव्हेंबरच्या सकाळी एंबरचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता.या हत्येच्या तीन दिवसानंतर म्हणजेच 1 डिसेंबरला पोलिसांनी एंबरचाच भाऊ कॉर्नरला अटक केली होती. या अटकेच्या एक दिवस आधीच भावाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून दु:ख व्यक्त केले होते.

पोलिसांकडून आरोपी भावाला अटक?

पोलिसांना एंबरचा मृतदेह मातीने माखलेल्या अवस्थेत सापडला होता. यावेळी प्राथमिक तपासात तिची गळा दाबून हत्या करत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले होते. पोलिसांना एंबरच्या मोठया भावाच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले होते. याचसोबस एंबरच्या कपड्यावर तिच्या डीएनएही सापडले होते. या डीएनएचा तपास केला असता, तो तिच्या भावाचा असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे लहान बहिणीवर भाऊ कॉर्नरने अत्याचार करून हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.

सुरुवातीला कॉर्नरने त्याच्यावर लागलेले हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र नंतर कॉर्नर त्याच्या बहिणीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात दोषी आढळला होता. या प्रकरणावर ग्लासगो हायकोर्टात 13 दिवस सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने त्याला तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.

हे ही वाचा : Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य

या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा