गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 25 लाख हुंडा… विमानतळावर पोहोचताच नवऱ्याने काढला पळ
पतीने आपल्या पत्नीला गोवा विमानतळावर (Goa airport) सोडून पळ काढल्याची धक्कायादक घटना उघडकीस झाली आहे
ADVERTISEMENT

Crime :
मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख झालेल्या अन् नुकतचं लग्न झालेल्या एका पतीने आपल्या पत्नीला गोवा विमानतळावर (Goa airport) सोडून पळ काढल्याची धक्कायादक घटना उघडकीस झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे जोडप हरियाणाचं आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी हरियाणातील फरिदाबादच्या सेक्टर-8 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी पती आणि त्याच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Husband left his wife at the Goa airport and ran away.)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वधूचे कुटुंब हरियाणातील फरिदाबादचे तर वराचे कुटुंब हिसारमधील आहे. मुलगा अबीर वैद्यकीय शिक्षण घेतो. तर त्याचे वडील अरविंद गुप्ता आणि आई आभा गुप्ता दोघेही डॉक्टर आहेत. दोघांचही हिसारमध्ये हॉस्पिटल आहे. मुलगा आणि मुलीची मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही भेटले, प्रेमात पडले अन् लग्नाचा निर्णय घेतला. कुटुंबियांनीही या लग्नाला संमती दिली.
chandrapur : बायको सोडून गेली! बापाचं हादरवून टाकणारं कृत्य, मुलाचा…
मुलीच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत काय माहिती दिली?
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपुड्यानंतर मुलाकडील मंडीळींच्या वेगवेगळ्या मागण्या समोर येऊ लागल्या. आम्हीही त्या पूर्ण करत गेलो. लग्नाच्या चर्चेदरम्यान मुलाच्या पालकांनी आमच्यासमोर एकुलत्या एक मुलाचे डेस्टिनेशन वेडिंग करण्याची इच्छा बोलून दाखविली. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन झाले. रिसॉर्टचा खर्च दोन्ही पक्ष मिळून करण्याचा निर्णय झाला.