देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सोन्याच्या बिस्किटांसह मिळालं कोट्यवधींचं घबाड, अधिकारीही चक्रावले
ठाणे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई केली. हैदराबादकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांना त्यांच्याकडे सोन्याच्या बिस्किटांसह कोट्यवधींचं घबाडचं सापडलं. हैदराबादवरू मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकार्यांना मिळाली होती. आरपीएफ व सीआयबीच्या पथकाने या माहितीच्या आधारे […]
ADVERTISEMENT

ठाणे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई केली. हैदराबादकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांना त्यांच्याकडे सोन्याच्या बिस्किटांसह कोट्यवधींचं घबाडचं सापडलं.
हैदराबादवरू मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकार्यांना मिळाली होती. आरपीएफ व सीआयबीच्या पथकाने या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकावर आलेल्या देवगिरी एक्स्प्रेस मधून पाच संशयितांना ताब्यात घेतलं.
गणेश मरिबा भगत, मयूर वालदास भाई कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १ लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ९ लाख १४ हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त केली.