गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेट; समलैंगिक संबंध ते निर्घृण खुनाची खळबळजनक घटना

मुंबई तक

UP Gay Relation Murder: यूपीच्या महोबा जिल्ह्यात 4 दिवसांपूर्वी खंडणीच्या मागणीसाठी तरुणाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांच्या तपासानंतर खळबळ उडाली असून, शहराबाहेरील निर्जनस्थळी असलेल्या घरात एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. ‘ब्लूड गे डेटिंग अॅप’च्या माध्यमातून भेटलेल्या दोन तरुणांनी ही हृदयद्रावक घटना घडवली आहे. तरुणाचे अपहरण करून नंतर खून केल्याने कुटुंबात खळबळ उडाली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

UP Gay Relation Murder: यूपीच्या महोबा जिल्ह्यात 4 दिवसांपूर्वी खंडणीच्या मागणीसाठी तरुणाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांच्या तपासानंतर खळबळ उडाली असून, शहराबाहेरील निर्जनस्थळी असलेल्या घरात एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. ‘ब्लूड गे डेटिंग अॅप’च्या माध्यमातून भेटलेल्या दोन तरुणांनी ही हृदयद्रावक घटना घडवली आहे. तरुणाचे अपहरण करून नंतर खून केल्याने कुटुंबात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही हत्येतील आरोपींना अटक करून खुनाचा मुद्देमाल जप्त केला आहे. बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. (meeting through a gay dating app; From homosexual relationships to brutal murders)

अडल्ट स्टारने प्रियकराचा चाकू भोसकून केला खून, नेमकं काय घडलं?

महोबा शहरातील हृदयद्रावक घटना

ही हृदयद्रावक खळबळजनक घटना महोबा शहरातील कोतवाली भागातील आहे. मोहल्ला बडीहाट येथे राहणारा 20 वर्षीय जितेंद्र यादव लहानपणापासूनच आपल्या मामा गजराज यादवसोबत राहत होता. त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर, त्याचे मामा गजराज यांनी पालनपोषण केले, परंतु मामा गजराज यांना हे फारसे माहीत नव्हते की चुकीच्या संगतीमुळे त्यांच्या पुतण्याचा मृत्यू होईल. मृत जितेंद्रला समलैंगिक मैत्री आणि संबंध ठेवण्याची सवय होती. त्यामुळे तो “ब्लूड गे डेटिंग अॅप” च्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात असायचा.

ब्लूड गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून जितेंद्र आरोपीना भेटला

या डेटिंग अॅपद्वारे तो चंद्रिका देवी मंदिराजवळ भाड्याने राहणारा चरखारी येथील रहिवासी नितेंद्र कुशवाह आणि फतेहपूर जिल्ह्यातील दारुता गावात राहणारा सूरज सेंगर यांना भेटला. या अॅपच्या माध्यमातून भेटल्यानंतर या तिघांमधील जवळीक वाढली. अशा स्थितीत मयत जितेंद्र यादव याच्या नावावर काही जमीन असल्याचे नितेंद्र व सूरज या गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणांना समजले, तेव्हा त्यांच्या दुष्ट मनाने, लवकरच श्रीमंत होण्याच्या लोभाने कट रचला.

हे वाचलं का?

    follow whatsapp