Mira Road Murder: तीन बकेट रक्त… प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये वाटले
हत्येचा सुगावा कुणाला लागू नये म्हणून मग त्याने राक्षसी कृत्य केले. लिव्ह इन पार्टनरचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवायचे आणि नंतर ते कधी कुत्र्यांना खाऊ घालायचे, तर कधी मिक्सरमध्ये वाटून नाल्यात फेकायचे, असं सगळं त्याचं सुरू होतं.
ADVERTISEMENT

Mira Road Murder News In Marathi : जिच्यावर प्रेम करायचा, तिलाच संपवलं. नंतर हत्या करूनच तो थांबला नाही, तर त्याने लाकूड कापायच्या कटरने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. हत्येचा सुगावा कुणाला लागू नये म्हणून मग त्याने राक्षसी कृत्य केले. लिव्ह इन पार्टनरचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवायचे आणि नंतर ते कधी कुत्र्यांना खाऊ घालायचे, तर कधी मिक्सरमध्ये वाटून नाल्यात फेकायचे, असं सगळं त्याचं सुरू होतं, पण बुधवारी (7 जून) बिंग फुटलं. गुन्हेगारीवर आधारित मालिकेलाही मागे टाकणारी ही घटना समोर कळल्यानंतर पोलिसांचाही थरकाप उडाला.
मुंबई उपनगरातील मीरा रोड भागात गीतानगर फेज 7 आहे. येथेच गीता आकाश दीप सोसायटी आहे. याच सोसायटीतील सातव्या मजल्यावर रुम क्रमांक 704 मध्ये 56 वर्षीय मनोज साने आणि 36 वर्षीय सरस्वती वैद्य हे दोघे राहत होते. मागील तीन वर्षांपासून ते या फ्लॅटमध्ये राहत होते. पण, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर जे घडलं, त्याने मुंबई उपनगरच हादरले.
तुकडे केले, प्रेशर कुकरमध्ये शिजवले
मनोज आणि सरस्वती राहत असलेल्या फ्लॅटमधून आजूबाजूच्या लोकांना दुर्गंध येऊ लागला. त्याचबरोबर मनोज साहनीच्या हालचालीही संशयास्पद वाटल्या. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी याची माहिती नयानगर पोलिसांना दिली.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचे मेहुणे पुन्हा अडचणीत, आता कोणती कारवाई?
माहिती मिळाल्यानंतर पोलीस सोसायटीत आले. पोलीस आल्याची कुणकुण लागताच मनोज साने हा लिफ्टमधून पोबारा करत होता. मात्र, पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. आणि फ्लॅटचा दरवाजा उघडला. त्यानंतर आत जे दृश्य दिसले, ते पाहून पोलीस आणि उपस्थितांचा धक्काच बसला.