औरंगाबाद : 'राज'सभेचा पदाधिकाऱ्याला फटका, गर्दीत 25 तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी पळवली

सभेत पाकीटमारी करणाऱ्या तरुणांनी पैशाच्या हिस्स्यातील वादावरुन एकाला भोसकलं
सभेला झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला
सभेला झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली सभा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. परंतू या सभेला उपस्थित राहणं मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार यांच्या गळ्यातली 25 तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माँटीसिंग हे 1 मे च्या सभेसाठी नांदेडवरुन औरंगाबादला कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. या सभेत हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. या गर्दीत माँटी यांच्या गळ्यातली चेन अज्ञात चोरट्याने पळवली. काही वेळाने याबद्दल माँटीसिंग यांना समजताच त्यांनी औरंगाबादेतील सीटी चौक पोलीस ठाण्यात या घटनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याच पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि सभेच्या आयोजनकांवर प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सभेला झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला
Loudspeaker Row : राज ठाकरेंच्या इशाऱ्यांनतर मुंबई पोलीस आयुक्त धर्मगुरुंना काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्या याच सभेत गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी करणाऱ्या तरुणांनीही पैश्याच्या हिस्स्यावरुन झालेल्या वादात आपल्याचसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला भोसकल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाला चाकूने भोसकणारे जुबेर खान आणि अकबर खान यांना 6 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायाधीशांनी दिले आहेत. या प्रकरणात जखमी झालेला मुलगा इमरान खान याने याप्रकरणात तक्रार दिली आहे. जुबेर आणि अकबर हे चुलत भाऊ आहेत. ही मंडळी घरातल्या महिलांसह भीक मागून उदरनिर्वाह करतात. पैसे पुरत नसल्यामुळे त्यांनी मग पाकीटमारी करायला सुरुवात केली.

सभेला झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला
'भाजपकडून सुपारी घेतल्यानंतर राज ठाकरेंचा थयथयाट सुरू', शिवसेनेने पुन्हा डिवचलं

1 मे ला सभेत या आरोपींनी आलेल्या व्यक्तींची पाकीट मारली. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी ढाब्यावर जेवणं केलं. यावेळी 14 वर्षीय साथीदाराने आपला हिस्सा मागितल्यानंतर जुबेर आणि अकबर यांनी त्याला मारहाण केली. जुबेरने अल्पवयीन मुलाच्या पोटात चाकू खुपसत त्याला जखमी केलं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in