Pune Crime : ५०० रुपये जीवावर बेतले! पर्यटक व्यावसायिकासोबत काय घडलं?

Murder in pune only for 500 Rupee : पुण्यात क्षुल्लक कारणावरुन पर्यटक व्यावसायिकाला गमवावा लागला जीव, नेमकं काय घडलं गॅरेजमध्ये? वाचा सविस्तर
५०० रुपयांसाठी पर्यटक व्यावसायिकाची हत्या.
५०० रुपयांसाठी पर्यटक व्यावसायिकाची हत्या.प्रातिनिधिक फोटो

Murder of tourist businessman in pune only for 500 Rupee

जुन्नर : तालुक्यातील आळेफाटा येथे क्रुझर गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ठरलेल्या व्यवहारात पाचशे रुपये कमी दिल्याने पर्यटक व्यावसायिकाचा खुन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (२४ जानेवारी) रात्री ही घटना उघडकीस आली आहे. विनायक उर्फ संतोष बबन गोडसे (४२) असं खुन झालेल्या पर्यटक व्यावसायिकाचं नाव आहे. तर मयुर अशोक सोमवंशी असं आरोपी गॅरेज कामगारचं नाव आहे. (Murder in pune only for 500 Rupee)

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात सचिन भिमाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मित्र विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याची क्रुझर गाडी नंबर MH 14 DT 5308 एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई यांच्या गॅरेजवर लावली होती. गाडी दुरस्ती बिलाच्या ७ हजार ६०० पैकी ७ हजार १०० रुपये रोख दिले होते. गॅरेज कामगार मयुर सोमवंशी याला ५०० रुपये देणे बाकी होते.

५०० रुपयांसाठी पर्यटक व्यावसायिकाची हत्या.
Pune Crime : एक गैरसमज अन् ७ जण जीवाला मुकले! 'असा' झाला हत्येचा उलगडा

याच बाकी ५०० रुपयांसाठी मयुरने मयत गोडसेंकडे फोनवर तगादा लावला होता. मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसेंना फोनवरून शिवीगाळ करत गॅरेजवर ये तुला बघून घेतो अशी धमकी दिली. संतोष आळेफाटा चौकातून लगेचच गॅरेजकडे गेला. यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. यातून आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांच्या छातीवर हातातील चाकूने वर केले आणि नंतर स्वतःवरही वार करुन घेतले.

५०० रुपयांसाठी पर्यटक व्यावसायिकाची हत्या.
Pune Crime : एकाच कुटुंबातील त्या 7 जणांची आत्महत्या नाही, तर हत्या!

घटनेनंतर जखमी संतोष गोडसे यांना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयुर सोमवंशी याच्या विरोधात भादंवि कलम ३०२, ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहे.

पोलीस बंदोबस्तात आरोपीवर उपचार सुरु :

पर्यटक व्यावसायिक संतोष बबन गोडसेंचा खून केल्यानंतर आरोपी मयूर सोमवंशीने स्वतःवरही वार करुन घेतले. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये रात्री दाखल केले. त्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in