Shraddha Walker: चायनीज चॉपरने केले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे, आफताबचा नवा खुलासा
श्रद्धा वालकर हत्याकांडात पोलिसांना आता एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. पोलिसांना ते हत्यार मिळालं आहे ज्याने आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर सर्वात आधी तिच्या मृतदेहापासून तिचे हात वेगळे केले होते. नार्को टेस्टमध्ये आफताबने एका छोट्या सुरीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. पोलिसांनी आता त्या ठिकाणीही शोध सुरू […]
ADVERTISEMENT

श्रद्धा वालकर हत्याकांडात पोलिसांना आता एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. पोलिसांना ते हत्यार मिळालं आहे ज्याने आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर सर्वात आधी तिच्या मृतदेहापासून तिचे हात वेगळे केले होते. नार्को टेस्टमध्ये आफताबने एका छोट्या सुरीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. पोलिसांनी आता त्या ठिकाणीही शोध सुरू केला आहे. आजतकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी काय दावा केला आहे?
पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटमधून काही धारदार हत्यारं ताब्यात घेतली आहेत असा दावा केला आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच हत्यारांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. पोलीस आता हे शोधत आहेत की आफताबने चायनिज चॉपर कुठून खरेदी केला होता.
पोलीस आणखी काय तपासत आहेत?
पोलीस आता हेदेखील तपासत अआहेत की जी हत्यारं मिळाली आहेत १८ मेच्या पूर्वी खरेदी केली गेली का? जर हे सिद्ध झालं तर की ही हत्यारं १८ मे पूर्वी घेण्यात आली आहेत तर हे आफताबने कट रचून हत्या केली हे स्पष्ट होईल. आफताब पोलिसांना चौकशीदरम्यान सातत्याने सांगतो आहे की त्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मोबाइल आपल्याजवळच ठेवला होता. मुंबई पोलिसांनी जेव्हा त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं त्यावेळीही आफताबकडे तो मोबाइल होता. त्यानंतर तो मोबाइल मुंबईतल्या समुद्रात फेकला.
तुरुंगात एकटा बुद्धिबळ खेळतो आफताब
श्रद्धा वालकर हत्यांकाड प्रकरणात पोलिसांनी आफताबची तासन् तास चौकशी केली आहे. त्याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी झाली आहे. त्याने खूप चलाखपणे या चौकशीच्या दरम्यान उत्तरं दिली आहेत. पोलिसांना चौकशीदरम्यान तो नवी माहिती देऊ शकलेला नाही. चौकशी दरम्यान तो शांत असतो. तुरुंगात तो एकटा बुद्धिबळ खेळतो. तिहार जेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बराक क्रमांक ४ मध्ये आफताबला ठेवण्यात आलं आहे. वेळ घालवण्यासाठी तो काही तास बुद्धिबळ खेळत बसतो.