संतोष पोळ… वाईमधील डॉक्टरच्या वेशातील राक्षसाची गोष्ट

मुंबई तक

महाराष्ट्रातला सातारा हा जिल्हा सगळ्याच बाबतीत संपन्न जिल्हा…. या जिल्ह्याला सगळ्याच गोष्टी अगदी भरभरुन मिळाल्या आहेत. निसर्गाने भरभरुन दान दिलंय, छत्रपतीचा जिल्हा म्हणून अशी ओळख आहे, इतिहासाचा समृद्ध वारसा आहे. याच सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात काही वर्षांपूर्वी एक बाई एका गावातून अचानक गायब झाली आणि नंतर बरेच दिवस तिचा पत्ताच लागला नाही. जेव्हा सापडला तेव्हा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रातला सातारा हा जिल्हा सगळ्याच बाबतीत संपन्न जिल्हा…. या जिल्ह्याला सगळ्याच गोष्टी अगदी भरभरुन मिळाल्या आहेत. निसर्गाने भरभरुन दान दिलंय, छत्रपतीचा जिल्हा म्हणून अशी ओळख आहे, इतिहासाचा समृद्ध वारसा आहे. याच सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात काही वर्षांपूर्वी एक बाई एका गावातून अचानक गायब झाली आणि नंतर बरेच दिवस तिचा पत्ताच लागला नाही. जेव्हा सापडला तेव्हा या बाईचा मृतदेहच हाती लागला. पण या मृतदेहामुळे सुरु झाला एका हत्याकांडांचा रहस्यमय प्रवास….

वाई मधलं ते फार्म हाऊस..फार्म हाऊसमधली नारळाची झाडं आणि या झा़डाखाली दडलेली अनेक वर्षांची भयानक रहस्यं आणि या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असलेला सो कॉल्ड डॉक्टर डेथ…. फक्त वाई नाही फक्त सातारा नाही तर सगळा महाराष्ट्र हादरुन गेला…कारण वाईमध्ये घडलेले हे हत्याकांडच तसं होतं.

वाईमधला अत्यंत निसर्गरम्य धोम धरणाचा परिसर आणि याच परिसरात होतं तीन एकरात पसरलेलं एक फार्महाऊस आणि याच गावात राहायचा एक डॉक्टर…हा डॉक्टर गावात देवमाणूस म्हणूनच ओळखला जायचा. कारणंही तसंच होतं. गाव आडवळणाला असल्याने अडीअडचणीला डॉक्टरची गरज ही असायचीच…त्यात पोळ डॉक्टर हा गावातला प्रतिष्ठीत माणूस…ग्रामपंचायत सदस्य, पोलिसांबरोबर उठबस, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा मेंबर तसेच एक बनावट नोटांचे प्रकरण याने पोलिसांना खबर दिली. त्यामुळे गावात जेवढा दबदबा आवश्यक तेवढा हा राखून होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp