Shraddha Murder Case : घरभाडे करार ते पाण्याचं बिल... 5 व्यक्तींचे जबाब आफताबला अडकवणार!

Aftab poonawalla Shraddha Walker Murder Case : आफताब पूनावालाविरोधात पोलिसांना आतापर्यंत काय मिळालं?
Aftab poonawalla Shraddha Walker Murder Case
Aftab poonawalla Shraddha Walker Murder Case

Shraddha Walker Murder update news : जिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता, त्याच श्रद्धा वालकरला आफताब अमीन पूनावालाने संपवलं. संपवल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. आफताबने याची चौकशीत कबुली दिलीये, पण हे सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पोलीस आता ठोस पुरावे शोधत आहेत.

आफताबने श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि मेहरोलीच्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. याच जंगलात पोलीस आता श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना आतापर्यंत १३ तुकडे मिळाले आहेत. पण, महत्त्वाचा पुरावा म्हणजे श्रद्धाचं शीर अजूनही पोलिसांना मिळालेलं नाही.

श्रद्धाच्या शिराबरोबर, तिचा मोबाईल फोनही पोलिसांना मिळालेलं नाही. त्याचबरोबर ज्या हत्याराने आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले, तो हत्यारही पोलिसांना मिळालेलं नाही. पण, या हत्याकांडातील काही गोष्टी आहेत, ज्या आफताबला दोषी सिद्ध करण्यास महत्त्वाच्या ठरू शकतात.

Aftab poonawalla Shraddha Walker Murder Case
Shraddha Murder Case : 10 तासांत श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबने बिअर घेतली अन्...

श्रद्धा वालकर हत्या : डॉ. अनिल कुमार...

18 मे रोजी आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या केली आणि तुकडे केले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे आरीने तुकडे केले. यावेळी त्याचा हातही कापला गेला होता. त्यासाठी आफताब डॉ. अनिल कुमार यांच्याकडे गेला होता.

डॉ. अनिल कुमार यांनी सांगितलं की, त्या रात्री जेव्हा आफताब पूनावाला आला. त्यावेळी तो नॉर्मल होता. डॉ. अनिल कुमार यांनी त्याला हात का कापला गेला असं विचारलं. तेव्हा त्याने फळ कापताना चिरल्याचं सांगितलं होतं. डॉ. अनिल कुमार यांनी आफताबला ओळखलं आहे. पोलिसांना त्यांनी याबद्दलची माहिती दिलीये.

Aftab poonawalla Shraddha Walker Murder Case
Shraddha Murder श्रद्धाप्रमाणेच Dexter वेबसीरिज पाहून जगभरात झाल्या आहेत 'इतक्या' हत्या

श्रद्धा वालकर हत्याकांड : रजत शुक्ला...

रजत शुक्ला हा श्रद्धाचा मित्र आहे. रजतने वृत्तसंस्थेला सांगितलं की, श्रद्धाने त्याला 2019 मध्ये सांगितलं होतं की, ती 2018 पासून आफताबसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघं सोबत राहत आहेत. सुरुवातीला दोघं आनंदात राहत होते. नंतर आफताबने मारहाण करायला सुरूवात केली. याबद्दल तिने रजतला सांगितलं होतं. श्रद्धाला आफताबला सोडायचं होतं, पण तिला ते करणं शक्य झालं नाही, असं रजतने सांगितलेलं आहे.

आफताब पूनावाला-श्रद्धा वालकर प्रकरण : लक्ष्मण नादिर...

श्रद्धा वालकरचा आणखी एक मित्र लक्ष्मण नादिरनेही या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिलीये. त्याने सांगितलं की, ऑगस्टनंतर श्रद्धाने मेसेजला रिप्लाय देणं बंद केलं होतं. तिचा फोनही स्विच ऑफ होता. काहीतरी गडबड असल्याचं मला वाटलं आणि त्यानंतर आपण तिच्या भावाला सांगितलं. तिच्यासोबत माझं शेवटचं बोलणं झालं होतं, तेव्हा आम्ही पोलिसांत जायला हवं होतं, असं लक्ष्मण नादिरने सांगितलं.

श्रद्धा आणि आफताब भांडायचे. एकदा तर दोघांमध्ये इतका वाद झाला की, आम्ही पोलीस ठाण्यात जाणार होते. मात्र, श्रद्धाने नकार दिला, असं नादिर म्हणाला. एका रात्री श्रद्धाने मेसेज केला होता की, तिला फ्लॅटवरून घेऊन जावं. जर इथं राहिले, तर आफताब तिला मारून टाकेल. आम्ही तिच्या घरी गेलो आणि पोलिसांत जाऊ, असंही आफताबला म्हणालो. पण, श्रद्धाने मनाई केली.

Aftab poonawalla Shraddha Walker Murder Case
Shraddha Murder : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे लपवले फ्रीजमध्ये, गर्लफ्रेंडला घेऊन आला घरी; आफताबने काय सांगितलं?

Shraddha Murder Case : सुदीप सचदेवा....

सुदीप सचदेवा हे त्या दुकानाचे मालक आहेत, जिथून आफताबने आरी खरेदी केली होती. त्याच आरीने आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. पोलीस आफताब पूनावालाला घेऊन त्या दुकानावर गेले होते.

आफताब पूनावाला : तिलक राज...

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी 300 लिटरचा फ्रीज खरेदी केला होता. हा फ्रीज तिलक राज यांच्या दुकानातून खरेदी केला होता. तिलक राज यांनी सांगितलं की, हा फ्रीज आफताबने 25,300 हजारात खरेदी केला होता.

Aftab poonawalla Shraddha Walker Murder Case
Shraddha Murder Case : "श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो" ऐकून पोलिसही हादरले

घरभाडे करार आणि पाण्याचं बिल आफताबला कसं ठरणार अडचणीचं?

दिल्ली सरकारच्या वतीने 20 हजार लिटर पाणी मोफत दिलं जातं. पण, आफताबवर 300 रुपये पाण्याचं बिल बाकी आहे. यातून आफताब महिन्याला 20 हजार लिटरपेक्षा जास्त पाणी वापरत होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब रक्त धुवून काढण्यासाठी पाण्याचा वापर करत होता, त्यामुळेच त्याचं बिल वाढलं. ही गोष्टही पोलिसांकडून पुरावा म्हणून सादर केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं.

श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे हिमाचल प्रदेशला फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती भेटली होती, जी दिल्लीतल्या छतरपूरमधील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत आल्यानंतर श्रद्धा आणि आफताब काही दिवस त्याच्याकडे राहिले होते.

त्यानंतर छतरपूरमध्ये दोघांनी भाड्यानं फ्लॅट घेतला. घरभाडे करारावर सुरुवातीला श्रद्धाचं नाव होतं आणि नंतर आफताबचं. या फ्लॅटचं भाडं 9 हजार रुपये होतं. आफताब प्रत्येक महिन्याच्या 8 ते 10 तारखेच्या दरम्यान ऑनलाईन भाडं द्यायचा. श्रद्धाची हत्या १८ मे रोजी झाली. त्याच्या काही दिवस आधीच फ्लॅट भाड्यानं घेण्यात आला होता. त्यामुळे आफताबने श्रद्धाची हत्या करण्यासाठी फ्लॅट भाड्यानं घेतला होता का? असा संशय पोलिसांना आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in