Sidhu Moose Wala Case: वेश बदलून गुंगारा देणाऱ्या संतोष जाधवचा ठिकाणा पोलिसांनी कसा शोधला?
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आलं. वर्षभरापासून मागावर असलेल्या पोलिसांनी संतोष जाधवला गुजरातमधील भूज जिल्ह्यातून अटक केली. सतोष जाधवला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, पोलिसांनी अटकेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा तपास करत असताना इतर जणांबरोबर पुण्यातील सौरभ ऊर्फ महाकाल आणि संतोष जाधव […]
ADVERTISEMENT

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आलं. वर्षभरापासून मागावर असलेल्या पोलिसांनी संतोष जाधवला गुजरातमधील भूज जिल्ह्यातून अटक केली. सतोष जाधवला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, पोलिसांनी अटकेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा तपास करत असताना इतर जणांबरोबर पुण्यातील सौरभ ऊर्फ महाकाल आणि संतोष जाधव यांच्यावर पोलिसांना संशय आला. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांची ओळख पटवल्यानंतर शोधाला गती दिली.
मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवचे गवळी गँगशी संबंध? काय म्हणाल्या आशा गवळी?
महत्त्वाचं म्हणजे संतोष जाधव गेल्या वर्षभरापासून फरार होता. ओंकार ऊर्फ राण्या बानखेले खून प्रकरणात त्यांच्याविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (गु. रजि. नं. ४५९/२०२१, भा.दं.वि. कलम ३०२, १२०(ब) ३४ शस्त्र अधिनियम कलम ३, २५. २७. सह मोक्का कलम ३(१)(ii), ३(४)) दाखल आहे.