सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण: मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी बरारला कॅलिफोर्नियात पकडलं

पंजाबचा सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची २९ मे २०२२ ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
sidhu moosewala murder mastermind goldy brar detained in calfornia says sources
sidhu moosewala murder mastermind goldy brar detained in calfornia says sources

पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातला मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी बरारला कॅलिफोर्नियातून ताब्यात घेण्यात आलं आहे. भारतातल्या गुप्तचर यंत्रणाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. याबाबत कॅलिफोर्निया किंवा भारत सरकारतर्फे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पंजाबचा सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची २९ मे २०२२ ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातला मास्टरमाईंड पकडला गेला आहे.

सिद्धू मुसेवाला जागीच ठार

सिद्धू मुसेवालावर करण्यात आलेला गोळीबार इतका भयंकर होता की तो जागेवरच ठार झाला. पोलिसांनी या प्रकरणी ३४ जणांना आरोपी केलं आहे. गोल्डी बरारने या हत्येचा कट आखला होता. लॉरेंस बिश्नोई सोबत एकत्र येत त्याने या हत्येचा कट रचला होता.

गोल्डी बरारवर १६ पेक्षा जास्त गुन्हे दाखल

सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी बरार हा लॉरेंस बिश्नोई गँगचा विश्वासू मानला जातो. गेल्या वर्षी पंजाबच्या फरिदकोट भागात एका न्यायालयाने युवक काँग्रेसचे नेते गुरलाल सिंह यांच्या पैलवानाच्या हत्ये प्रकरणात गोल्डीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही लागू केला आहे. तसंच १६ पेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध पोलीस घेत होते. भारतातून तो कॅनडाला पळाला होता.

गोल्डी बरारविरोधात रेड कॉर्नर नोटीस

गेल्या काही दिवसांमध्ये इंटरपोलने गोल्डी बरारच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. गोल्डी बरारने कॅनडात बसून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचला होता. याच प्रकरणात तिहार जेलमध्ये असलेल्या लाँरेन्स बिश्नोईचीही चौकशी करण्यात येते आहे. गोल्डी बरारविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि कट रचणं तसंच हत्यारांची तस्करी याचे आरोप आहेत.

कोण होता सिद्धू मुसेवाला

17 जून 1993 रोजी जन्मलेला शुभदीप सिंग सिद्धू उर्फ ​​सिद्धू मूसवाला हा मानसा जिल्ह्यातील मुसा वाला गावचा रहिवासी होता. मूसवालाचे लाखो चाहते आहेत आणि ते त्याच्या गँगस्टर रॅपसाठी लोकप्रिय होते. सिद्धू मुसेवाला याची आई गावाची सरपंच होती. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. महाविद्यालयीन जीवनात त्याने संगीताचं शिक्षण घेतलं आणि नंतर तो कॅनडाला गेला.

मूसवाला हा सर्वात वादग्रस्त पंजाबी गायकांपैकी एक म्हणूनही ओळखला जातो ज्याने खुलेआम बंदूक संस्कृतीचा प्रचार केला होता. तो प्रक्षोभक गाण्यांमध्ये गुंडांचा गौरव करायचा. सप्टेंबर 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'जट्टी जिओने मोड दी गुंतक वर्गी' या गाण्याने 18व्या शतकातील शीख योद्धा माई भागोच्या संदर्भात वाद निर्माण केला होता. या शीख योद्ध्याची प्रतिमा डागाळल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आळा होता. मात्र, नंतर मुसेवाला यानी माफी मागितली होती.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in