दुर्दैवी! डोंबिवलीत लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे डोंबिवली पूर्व भागातल्या सागर्ली गावात एका बेकायदा इमारतीला लिफ्टची सुविधा देण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने सागर्ली भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेदांत हनुमंत जाधव (वय-६) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सांगर्लीमधील विघ्नहर्ता इमारतीत तळ मजल्याला आजी, आजोबा आणि वडिलांसोबत राहत […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे
डोंबिवली पूर्व भागातल्या सागर्ली गावात एका बेकायदा इमारतीला लिफ्टची सुविधा देण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने सागर्ली भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेदांत हनुमंत जाधव (वय-६) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सांगर्लीमधील विघ्नहर्ता इमारतीत तळ मजल्याला आजी, आजोबा आणि वडिलांसोबत राहत होता.
डोंबिवली: ‘तुमचे 50 हजार नको, मी देतो तुम्हाला 50 हजार’, मंत्री आठवलेंना चारचौघात सुनावलं!
वेदांत एक वर्षाचा असताना आईला तो पारखा झाला. त्याचा सांभाळ आजी, आजोबा करत होते. मंगळवारी सकाळी वेदांत नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी बाहेर गेला. तो दुपारी जेवण करण्यासाठी परत आला नाही. त्यानंतर त्याच्या आजी-आजोबांनी शोधाशोध केली. तो कुठेच आढळला नाही. त्याचे नेहमीचे मित्र घरी होते. त्यांनीही वेदांतला आम्ही पाहिले नाही असे सांगितले. त्यामुळे आजी आणि आजोबा घाबरले. परिसरातील रहिवाशांनी वेदांतचा शोध सुरू केला. या भागातील विहिरी, नाले तपासण्यात आले.