Vasai crime news : झोपलेल्या आईवर कुऱ्हाडीने घाव; 17 वर्षाच्या मुलाने का केली हत्या?
vasai Crime news in marathi : horrible incident in vasai east. 17 year old boy killed his mother while woman sleeping
ADVERTISEMENT
Minor killed his mother in vasai : अवघं 17 वर्ष वय असलेल्या एका मुलाने कुऱ्हाडीने घाव घातल आईची हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेश, बिहारमध्ये नव्हे, तर मुंबईला लागून असलेल्या वसईमध्ये घडलीये. या घटनेनं खळबळ उडाली असून, विधी संघर्षग्रस्त मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (A Minor boy killed his mother in vasai over family dispute)
ADVERTISEMENT
36 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसही हादरले. याच कारण म्हणजे महिलेची हत्या तिच्याच 17 वर्षाच्या मुलाने केली होती. ही घटना घडली रविवारी रात्री म्हणजे 20 ऑगस्ट रोजी. पोलिसांनी किशोरवयीन मुलाविरुद्ध बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव सुनिता घोगरा असे आहे.
मृत महिला होती ग्रामपंचायत सदस्य
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 2022 माजिवली-देपिवली ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सुनिता घोगरा या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सुनिता घोगरा यांचा मृत्यू त्यांच्याच मुलाने केलेल्या हल्ल्यात झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हे वाचलं का?
वसईत मुलाने केली आईची हत्या, नेमकं काय घडलं?
सुनिता घोगरा या वसई (पूर्व) येथील वालीव येथील एका कारखान्यात काम करायच्या. रविवारी (20 ऑगस्ट) रात्री 10 च्या सुमारास, त्या आणि त्यांचा मुलगा जेवण करत होते. आपली आई सतत मोबाईलवर असते. रात्री अपरात्री मेसेज पाठवते, याचा मुलाला राग येत होता.
हेही वाचा >> Mumbai Crime : अल्पवयीन मुलगी रिक्षात बसली अन् वासनांध चालकाने… घटनेने शहर हादरलं
यावरूनच जेवण करत असताना दोघांमध्ये भांडणही झालं. जेवण झाल्यानंतर सुनिता घोगरा या त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या होत्या. त्यांना झोप लागल्यानंतर अल्पवयीन मुलगा त्यांच्या रुममध्ये गेला. त्यानंतर त्याने आईवर कुऱ्हाडीने वार केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Lok Sabha Election : राष्ट्रवादाची खेळपट्टी, हिंदुत्वाचा अजेंडा अन्…; ही आहे भाजपची स्ट्रॅटजी!
ही घटना घडली त्यावेळी सुनिता यांचा पती हा कामावर होते. आईची हत्या केल्यानंतर मुलगा घरातून पळून गेला. कामावरून घरी आल्यानंतर पतीला सुनिता या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. सुनिता घोगरा यांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना कळव्यातील रुग्णालयात हलवण्यात आले, तिथेच त्यांचा उपचारादरम्यान सोमवारी (21 ऑगस्ट) रात्री त्यांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
घटनेबद्दल पोलिसांनी काय सांगितलं?
17 वर्षाच्या मुलाने हत्या केल्याच्या घटनेबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितले की, ‘हत्येचे नेमके कारण कळले नसले, तरी हत्या करणाऱ्या मुलाचा त्याच्या आईवर राग होता. आपल्या आईचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT