Crime: 75 वर्षांच्या सासऱ्यासोबत सुनेचे अनैतिक संबंध, नंतर सासऱ्याच्या गुप्तांगावरच केले वार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

75 year old father-in-law had immoral relations with his daughter-in-law then manisha sharma murdered the because of money gujarat crime
75 year old father-in-law had immoral relations with his daughter-in-law then manisha sharma murdered the because of money gujarat crime
social share
google news

Immoral relations and Murder: नातेसंबंध हे दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहेत. ज्यामधून गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहेत. अशात एका महिलेने अनैतिक संबंध (Immoral relations) आणि पैशाच्या वादातून आपल्या सासऱ्याचीच (Father-in-law) हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना आता समोर आले आहेत. ही घटना गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील असल्याचं समजतं आहे. ज्यामध्ये सुनेचे (Daughter-in-law) आधी सासऱ्यांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर पैशाच्या लालसेपोटी त्याने सासरची हत्या केली. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे. ( 75 year old father in law had immoral relations with his daughter in law then manisha sharma murdered the because of money gujarat crime)

ADVERTISEMENT

सुनेचे सासऱ्यांसोबत अनैतिक संबंध

गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील डाकोर येथील भगत जैन परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जगदीश शर्मा (वय 75 वर्षे) हे काही दिवसांपासून बेपत्ता होते. बेपत्ता झाल्याने चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी जगदीश यांचा सर्वत्र शोध सुरू केला. यावेळी सर्व नातेवाईक आणि मित्रांकडे देखील चौकशी करण्यात आली. मात्र जगदीश यांचा कोणताही मागमूस लागला नाही.

यानंतर कुटुंबीयांनी चोल या गावी असलेलं आपलं दुसरं घर गाठलं. जे आधीच कुलूप लावून बंद करण्यात आलं होतं. यावेळी कुटुंबीयांनी थेट कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पण त्यानंतर कुटुंबीयांना समोर जे दिसलं त्याने सगळेच हादरून गेले. कारण मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जगदीश शर्मा यांचा नग्न अवस्थेतील छिन्नविच्छिन्न मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Crime : महिलेच्या डोक्यात वासनेचं भूत, पतीला पाजायची अंमली दूध; नंतर दिरासोबत…

त्यानंतर याप्रकरणाची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. तपासाअंती अहवाल आला असता डोक्याला व गुप्तांगाला गंभीर दुखापत झाल्याने जगदीश शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, यावेळी जगदीश शर्मा यांच्या मोठ्या मुलाने या हत्येप्रकरणी आपल्या धाकट्या भावाच्या पत्नीवर संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी जगदीश शर्मा यांच्या धाकट्या सुनेची म्हणजेच मनीषा शर्मा हिची कसून चौकशी केली. याच चौकशीतून जे सत्य समोर आले त्याने सगळेच हादरून गेले.

ADVERTISEMENT

…म्हणून सुनेने केली सासऱ्यांची हत्या!

पोलीस चौकशीत सुनेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी मनिषाने पोलिसांना दिलेलया जबाबानुसार, तिचे सासरे जगदीश यांच्याशी अनैतिक संबंध होते. ज्या मोबदल्यात ती तिच्या सासऱ्यांकडून अनेकदा पैसेही उकळत होती. याच दरम्यान ती फेसबुकच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या संपर्कात आली. ज्याने तिला परदेशात नेण्याचे स्वप्न दाखवले. मनिषा देखील या व्यक्तीच्या बोलण्याला भुलली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ambernath Crime: मेव्हण्याने भाऊजीचं गुप्तांगच कापलं, कोयत्याने निर्घृण हल्ला; नेमकं काय घडलं?

मात्र, परदेशात जाण्यासाठी त्या व्यक्तीने मनिषाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. यावेळी एवढे पैसे कसे आणायचे हा प्रश्न मनिषासमोर होताच. पण यावेळी मनिषाने थेट सासऱ्यांकडेच दोन लाख रुपयांची मागणी करू लागले. पण एवढी मोठी रक्कम देण्यास सासरे जगदीश शर्मा याने नकार दिला. जगदीश शर्माने पैसे देण्यास नकार दिल्याने मनीषा संतप्त झाली आणि तिने आपल्या सासऱ्याच्या हत्येचा कट रचला.

आधी सासऱ्यासोबत शारीरिक संबंध अन् नंतर गुप्तांगावर वार

सासऱ्याच्या हत्येच्या कटाचा एक भाग म्हणून मनिषाने आपल्या सासऱ्याला गोड बोलून चोल येथल्या घरी नेले. जिथे तिने सासऱ्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर अचानक सासऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यानंतर तिने सासऱ्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी सून ही घराबाहेर पडली. पण यावेळी तिने घराला बाहेर कुलूप लावून घेतलं. त्यानंतर ती तिच्या सासरकडील मूळ घरी पोहचली आणि काहीही वावगं झालेलं नाही अशा अविर्भावात राहू लागली. दोन दिवसांनी जेव्हा जगदीश बेपत्ता झाल्याचं समोर आलं तेव्हा ती देखील सासऱ्यांचा शोध घेण्याचे नाटक करू लागली. पण अखेर आता तिचे बिंग फुटलं आहे.

याप्रकरणी, पोलिसांनी महिला आरोपी मनीषा शर्मा हिला तिच्याच सासरच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT