Thane Crime: सेलोटेपने गुंडाळलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाचं गूढ अखेर उघडकीस

मुंबई तक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच हत्या केल्याची घटना ठाण्यातील मुंब्रा येथे उघडकीस आली आहे. जाणून घ्या पोलिसांनी आरोपी पतीला नेमकी कशी केली अटक.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाणे: ठाण्यातील मुंब्रा (Mumbra) येथील रेतीबंदर परिसरात खाडी किनारी 27 मे रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह (Woman Dead body) चादरमध्ये बांधून सेलो टेपच्या सहाय्याने गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करून महिलेच्या पतीला पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. तपास करत असताना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. (wife murder husband suspecting his character mumbara thane crime news)

नेमकं प्रकरण काय?

ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर परिसरात खाडी किनारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह चादरीत बांधून सेलो टेपच्या सहाय्याने गुंडाळून फेकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मृतदेहाचा दुर्गंध पसरू लागल्याने स्थानिकांनी मुंब्रा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या प्रकरणी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना कुठलेही पुरावे नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तीन पथके नेमली. या तीन पथकातील एका पथकाने आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यांमधील मिसिंगच्या तक्रारी तपासल्या तर दुसऱ्या पथकाने घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्हीचा शोध घेतला.

या सीसीटीव्हीमध्ये एक टेम्पो संशयास्पद असल्याचे पोलिसांना आढळून आले. या टेम्पोचा नंबर दिसून न आल्याने टेम्पोच्या दिशेने पोलिसांनी जवळपास 20 ते 22 सीसीटीव्ही तपासून शोध घेत मुंबईच्या अंधेरीत पोहचले. पोलिसांनी तपास केला असता मयत महिलेचे नाव मुन्नी नवाब शेख असल्याचे पोलिसांना कळले. तसेच नवाब शेख आणि मुन्नी शेख हे दोघे पती-पत्नी असून 24 तारखेपासून ते दोघेही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी गतिमान पद्धतीने तपास केला असता महिलेचा पती नवाब शेख हा फरार असून पश्चिम बंगाल येथे पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

हे ही वाचा >> Mira Road Murder: ‘HIV पॉझिटिव्ह, शारीरिक संबंध…’ मनोज साने प्रचंड चाणाक्ष आरोपी!

पोलिसांनी या आरोपी पतीचा शोध घेण्यसाठी पश्चिम बंगाल मुर्शिदाबाद या ठिकाणी एक पथक रवाना करून त्याचा शोध घेण्याचे आदेश दिले असता हा आरोपी नियोजन पद्धतीने खून करून पकडले जाऊ नये यासाठी मोबाइल बंद करून वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता. मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने तपास करून तब्बल दोन जिल्ह्यांमध्ये 8 दिवस कसोशीने तपास करून तांत्रिक यंत्रणांच्या सहाय्याने आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास करून नवाब शेखला 7 जून रोजी अटक केली. अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा सहभाग आढळून आल्यानंतर त्याला बहिरामपूर, मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची ट्रान्झीस्ट रिमांड मंजूर करून 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp