Sextortion : तरुणीने टाकलं प्रेमाचं जाळं अन् रेल्वे कर्मचाऱ्याचा गेला जीव; करु नका ‘ही’ चूक
sextortion meaning in marathi : रेल्वे कर्मचाऱ्याला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने आर्थिक शोषणाला कंटाळून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

Sextortion Case in India : तरुणीने फेसबुकवरून टाकलेल्या जाळ्यात रेल्वे कर्मचारी अडकला. प्रकरण इतकं पुढे गेलं की, त्याला आत्महत्या करावी लागली. लैंगिक शोषणाचे नवे प्रकरण समोर आले आहे. फेसबुकवरून सुरू झालेल्या या कहाणीचा शेवट आत्महत्येनं झाला आहे. हे प्रकरण काय… आणि ते टाळण्यासाठी काय करायला हवं, जाणून घेऊयात…
या प्रकरणाची सुरुवात फेसबुकवरून झाली. मयत रेल्वे कर्मचाऱ्याला एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. फेसबुकवर तरुणीचे नाव कोमल शर्मा होते. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तिने चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुरू केले. शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या तक्रारीवरून ही माहिती मिळाली आहे.
हेही वाचा >> इंटरव्ह्यूला निघालेल्या तरुणीवर कॅबमध्येच सपासप वार; कारण आलं समोर
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉलिंगदरम्यान काही अश्लील कृती झाली, जी तरुणीने रेकॉर्ड केली. यानंतर तरुणीने रेल्वे कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि अखेर रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.
पैशांची मागणी अन् आत्महत्येने शेवट
आरोपी तरुणीने सुरुवातीला 2 लाख रुपयांची मागणी केली. मयत व्यक्तीने कशीतरी व्यवस्था करून तरुणीला पाठवले. यानंतरही ब्लॅकमेलिंग सुरूच राहिली. तरुणीकडून रेल्वे कर्मचाऱ्यांचा छळ सुरूच होता. पुढे कोमल व्यतिरिक्त आणखी दोन जणांनी तिचे नाव घेऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.