मानेत खुपसलेला सुरा घेऊन बाईक चालवली, हॉस्पिलटमध्ये पोहोचताच डॉक्टरही अवाक

मुंबई तक

ADVERTISEMENT

He rode a bike with a knife stuck in his neck, the doctor was speechless as soon as he reached the hospital
He rode a bike with a knife stuck in his neck, the doctor was speechless as soon as he reached the hospital
social share
google news

कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून भावानेच भावावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हल्यानंतर चाकू भोसकले्ल्या अवस्थेत तरूणाने बाईकवरून सुमारे एक किलोमीटरचा प्रवास करून सानपाड्यातील एमपीसीटी हॉस्पिटल गाठले. तरूणाला अशा अवस्थेत पाहून डॉक्टर देखील अवाक झाले होते.मात्र डॉक्टरांनी तत्काळ उपचार करून त्याचे प्राण वाचवले आहे. तेजस पाटील असे या तरूणाचे नाव असून सुदैवाने तो या घटनेतून बचावला आहे. या प्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.(a man drive bike with knife stuck in his neck to reach hospital navi mumbai shocking incident)

हॉस्पिटलमधून टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तेजस पाटील म्हणाले, “माझा धाकटा भाऊ मोनिष पाटील (28) याने सकाळी घरी झोपेत असताना माझ्या गळ्यावर वार केले. त्याच्यासोबत त्याचा मित्र होता. यावेळी मोनीशने मला मारण्याचा प्रयत्न केल्याने मला धक्काच बसला. तो मित्र (महेशच्या) वाईट संगतीत होता आणि त्याला दारू पिण्याची सवय आहे,असे तो म्हणाला. मालमत्तेवून दोन्ही भावामध्ये वाद झाल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : Dinesh Sharma : ‘माझी सहनशक्तीच संपलीय’, माजी IPS अधिकाऱ्याने स्वत:ला का संपवलं?

तेजस पाटील सकाळी 9.15 च्या सुमारास दुचाकीवरून त्याच्या मानेच्या उजव्या बाजूला खोलवर वार केलेला चाकू घेऊन रुग्णालयात आला होता. यावेळी तत्काळ शस्त्रक्रियेसाठी टीम नेमण्यात आली.या टीममध्ये डॉ. विनोद पचाडे (प्लास्टिक सर्जन), डॉ. आदित्य पाटील (न्यूरोसर्जन), डॉ. मौनील भुता (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट), कार्डिओ-व्हस्कुलर सर्जन आणि ऍनेस्थेटिस्ट यांच्यासह तज्ञ डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली. यावेळी चाकूचा ब्लेड गळ्यात किती प्रमाणात टोचला आणि आजूबाजूच्या प्रदेशात किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी मान, मेंदू आणि वक्षस्थळाचे सीटी स्कॅन तातडीने केले गेले आणि त्यानुसार उपचार सुरू केले असल्याची माहिती एमपीसीटी रुग्णालयाचे डॉ. प्रिन्स सुराणा यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ते पुढे म्हणाले, “मानेमध्ये चिरलेली जखम कपाळाच्या डाव्या बाजूला 8 सेमी x 1.5 सेमी हाड खोल होती. यावेळी अत्यंत सावधगिरीने आणि प्रयत्नांनी चाकू काढण्यात आला आणि तो वार झाला तेव्हा कोणतीही मोठी रक्तवाहिनी आणि मज्जातंतूला इजा झाली नाही हे सुदैवाने.तब्बल 4 तास शस्त्रक्रिया चालली आणि यशस्वी झाली. त्यानंतर रुग्णाला पुढील निरीक्षणासाठी ICU मध्ये हलवण्यात आले होते. तो एक दिवस मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर होता आणि स्थिर झाल्यानंतर सोमवारी त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तो पूर्णपणे धोक्याबाहेर असून दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

या प्रकरणावर सानपाड्याचे वरिष्ठ निरीक्षक बापूराव देशमुख म्हणाले, “आम्ही रविवारी रुग्णालयात तेजस पाटील यांचा जबाब नोंदवला, त्यावेळी त्यांनी आरोपीचे नाव सांगितले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, आम्ही आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०७ दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : सुसंस्कृत पुणे हादरलं, अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बायकोने पतीचा घरातच काढला काटा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT