अजित पवारांच्या बारामतीत चाललंय तरी काय?, दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून..

मुंबई तक

ADVERTISEMENT

A shocking incident has taken place in Baramati, the constituency of Deputy Chief Minister Ajit Pawar, where he tried to rob the manager of a petrol pump with a pistol.
A shocking incident has taken place in Baramati, the constituency of Deputy Chief Minister Ajit Pawar, where he tried to rob the manager of a petrol pump with a pistol.
social share
google news

Baramati Robbery: वसंत मोरे, बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रशासनात प्रचंड दबदबा असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामती (Baramati) मतदारसंघात सध्या कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. बारामती शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या पेट्रोल पंपावर (Petrol Pump) व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा (Robbery) टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पाटस रस्त्यावरील कृष्ण पेट्रोल पंपावर ही घटना घडली. दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे बारामतीत खळबळ उडाली आहेत. (ajit pawars constituency baramati shocking incident tried to rob the manager of a petrol pump with a pistol)

शहरातील पाटस रस्त्यावर असणाऱ्या कृष्ण पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मयूर शिंदे (वय 32 वर्ष) हे पेट्रोल पंपावरील रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत लुटण्याचा प्रकार घडला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. मात्र त्यांनी केलेल्या निकराच्या प्रतिकारामुळे दोघा चोरट्यांनी रक्कम न घेताच तेथून पळ काढला.

नेमकी घटना काय घडली?

व्यवस्थापक मयूर शिंदे हे नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावरील रक्कम घेऊन दुचाकीवरून शहराच्या दिशेने निघाले होते. यावेळी स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला त्यांच्याकडे रक्कम असलेली बॅग हिसका मारून पळून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे यांनी पैसे असलेली बॅग पोटाखाली दाबून ठेवली. बॅग हाती मिळत नसल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी मयूर शिंदेंना काही अंतरापर्यंत फरपटतही नेलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ratnagiri: नीलिमा चव्हाणचा नेमका मृत्यू कसा झाला?, पोलिसांनी दिली मोठी माहिती

तरीही शिंदे यांनी आपली चिकाटी सोडली नाही. चोरट्यांना बॅग मिळू नये यासाठी त्यांनी जीवाची शिकस्त केली. या घटनेत चोरट्यांनी त्यांना जबर मारहाण केली. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बारामतीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Sana Khan: नागपूरमधील भाजप महिला नेता बेपत्ता, हत्या झाल्याचा संशय

बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मालकीचा हा पेट्रोल पंप आहे. हे काम माहितीतील व्यक्तीने केले असावे. बारामतीत भर दिवसा अशा घटना घडणे चिंतेची बाब आहे. सुदैवाने रक्कम चोरीला गेली नाही, मात्र आमचे व्यवस्थापक मयूर शिंदे हे जबर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्या उपचाराच्या कामात आम्ही आहोत. अशी प्रतिक्रिया किरण गुजर यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT